मराठी साहित्य मंच ने केला आगळ्यावेगळ्या ऑनलाईन सोहळ्यातुन ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान

मराठी साहित्य मंच ने केला आगळ्यावेगळ्या ऑनलाईन सोहळ्यातुन ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान
बीड (दि.१ ऑक्टोबर)
काव्यरत्न प्रा.रावसाहेब राशिनकर (साहेब) यांच्या संकल्पनेतुन अप्रतिम नियोजन
अहमदनगर (दि.१ऑक्टोबर)
साहित्य क्षेत्रातील नावाजलेल्या व विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांनी साहित्य क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या मराठी साहित्य मंच व साहित्य तारांगण समूहात साहित्य मंच चे सर्वेसर्वा राज्यस्तरीय कुसुमाग्रज गौरव पुरस्काराने सन्मानित काव्यरत्न प्रा.रावसाहेब राशिनकर(साहेब)यांच्या संकल्पनेतून दि.१ ऑक्टोबर२०२० रोजी ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून "आधार"या विषयावर काव्यलेखन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच साहित्य मंच मध्ये असणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक, कवी,कवयित्री यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काव्यरत्न प्रा.रावसाहेब राशिनकर(साहेब)यांनी आगळ्या-वेगळ्या ऑनलाईन ज्येष्ठ नागरिक/साहित्यिक विशेष सन्मान सोहळ्याचे साहित्य समूहात आयोजन केले होते. या सोहळ्यासाठी, समुह संस्थापक अंगदजी दराडे,समुह प्रशासक, नंदकुमार शेंदरे, सौ.शालू विनोद कृपाले(गोंदिया),ज्येष्ठ कवयित्री विजया शिंदे(कल्याण), कवयित्री रुपाली चौधरी(धुळे),कवी व ग्राफिक्सकार,राहुल अनपट यांचे सहकार्य लाभले, या सन्मान सोहळ्यात, ज्येष्ठ कवयित्री रजनी अ. पाटील(खारघर),पुष्पा निराळी (संगमनेर), कल्पना म्हापुसकर(मीरारोड),रत्ना भोरे(बंगलोर), मीना सानप(बीड),नलिनी पवार(पुणे)
,सीमा भंडारे,(पुणे),कविता वालावलकर (कर्नाटक),मंजुश्री शिवाजी वाळुंज(अहमदनगर),रजनी राज आहेरराव,सौ.सुलभा कुलकर्णी,किशोरी शंकर पाटील, कलानंद जाधव (हिंगोली),सुभाष महाराज बडधे,बेलापूरकर, शोभा वागळे (मुंबई), रामकृष्ण दशरथ नागरगोजे(बीड),शीला पाटील,(चांदवड) या साहित्यिकांचा आकर्षक ऑनलाईन सन्मानपत्र देऊन शब्दसुमनांनी गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन ,नियोजन, सूत्रसंचालन काव्यरत्न प्रा.रावसाहेब राशिनकर यांनी केले.या आगळ्या-वेगळ्या ऑनलाईन सोहळ्याचे साहित्य क्षेत्रातील मान्यवर कवी कवयित्री यांच्याकडुन कौतुक होत असून अनेकांनी समूहात लेखी अभिप्राय देऊन कौतुकही केले आहे.








