सोशल डिस्टंसिंगचे पालन करून सरस्वती विद्यालयांमध्ये महात्मा गांधीजींची 151 वी जयंती साजरी

Beed

सोशल डिस्टंसिंगचे पालन करून सरस्वती विद्यालयांमध्ये महात्मा गांधीजींची 151 वी जयंती साजरी

किल्लेधारूर/प्रतिनिधी
 
  राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस शाळेतील मुख्याध्यापक श्री जगदीशजी तोषनीवाल व प्राथमिक चे मुख्याध्यापक श्री काशिनाथ दळवे सर यांनी पुष्पहार अर्पण केला. तसेच "भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये महात्मा गांधीजींनी केलेला त्याग व भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी भारताला स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी जनतेला केलेले आव्हान" या विषयीची व कार्याची सखोल माहिती शाळेतील शिक्षक विजय काळे सरांनी  दिली. या कार्यक्रमाला शाळेतील माध्यमिक चे मुख्याध्यापक श्री जगदीशजी तोष्णीवाल सर प्रा. वी चे मुख्याध्यापक श्री काशिनाथ दळवे सर , शिंपले सर, मुंडे सर  वरकले सर,  चरखा मॅडम, मुंडे मॅडम, काळे शिंदे सर , राम सर, कंकाळ सर इत्यादी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते सूत्रसंचालन अमर शुक्ला सर व आभार प्रदर्शन वरकले सरांनी केले.

Sharing

Visitor Counter