बीड जिल्हा शल्य चिकित्सकांने आव्हान करताच,पापुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न

बीड जिल्हा शल्य चिकित्सकांने आव्हान करताच,पापुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न
बीड/प्रतिनिधी
कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर लॉकडाउनच फटका जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीला बसला आहे़.ऑगस्ट महिन्यात केवळ पाच रक्तदान शिबिर झाले तर सप्टेंबर महिन्यात नऊ शिबिर झाली होते यातूनही अपेक्षित रक्त संकलन झाल्याने जिल्हा रक्तपेढीत रक्ताची टंचाई आहे तर दुसरीकडे कोरोनाबाधीतांवर उपचारासाठी रक्तदान चळवळही थंड असून नागरिकांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे़ अशे अव्हान बीड जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केलं होत यालाच मान देऊन पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या आज तकिया मस्जीद कब्रस्तान येथे ब्लड डोनेशन कॅम्प घेण्यात आलं व चांगल्या प्रकारे याठिकाणी लोकांनी प्रोत्साहन दिले व ब्लड डोनेशन केलं यावेळी उपस्थित लोकनेते मोईन मास्टर,पाॅप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया बीड जिल्हा अध्यक्ष शेख वसीम व आदींची उपस्थिती होती.
बीड जिल्हा शल्यचिकित्सक हे उद्घाटन ला आले नसल्यामुळे लोकांची नाराजगी !
एकीकडे प्रशासन लोकांना आव्हान करते कि ब्लड डोनेशन कॅम्प घ्यावे यांच्या शब्दाला मान देऊन पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या वतीने कॅम्प घेण्यात आला तर उद्घाटन समारंभाला कालच बीड जिल्हा शल्य चिकित्सक यांना आमंत्रण देण्यात आला होतं व आज त्यांच्या साठी बराच वेळ कार्यक्रम थांबवला परंतु ते काही कारणामुळे आले नसल्याने जमाव नागरिक नाराज झाल्याचे चित्र त्या ठिकाणी पाहण्यास भेटले.








