पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया तर्फे तकिया मस्जिद येथे यशस्वी रक्तदान शिबीर संपन्न

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया तर्फे तकिया मस्जिद येथे यशस्वी रक्तदान शिबीर संपन्न
बीड/प्रतिनिधी
सध्या देशभरात कोरोना ने हाहाकार माजवला आहे. सरकार व प्रशासनातर्फे या रोगाचे प्रसार थांबवण्यासाठी अतोनात प्रयत्न सुरू आहे तसेच सर्वसामान्य जनता सरकारने दिलेल्या निर्देशांचे पालन करुन या रोगाविरूद्ध सहकार्य करत आहे. पण तरीही जे रुग्ण कोरोना ग्रस्त झालेत व ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे अश्या रुग्णांसाठी प्लाझ्मा आणि रक्ताची आवश्यकता असते. या वेळी आपल्या जिल्ह्यात रक्ताची टंचाई भासत असुन बीड़ जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अशोक थोरात यांनी याबाबत चिंता व्यक्त केली होती याचीच दखल घेऊन पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या सामाजिक संघटनेने तकिया मस्जिद गुलजार पूरा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले व डॉ अशोक थोरात यांनी सर्व नागरिकांना आव्हान केले की या रक्तदान शिबिरामध्ये जास्तीत सहभाग घ्यावा व या संकटकाळी मदत करावी. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया कडून सर्व पदाधिकाऱ्यांनी पुर्ण शहरात या शिबिराचे प्रचार करुन लोकांना या शिबिरात सहभाग घेण्यास प्रोत्साहित केले आणि स्थानिक माध्यमातून रक्तदान शिबीराचे महत्व पटवून दिले यामुळे शिबिरास नागरिकांचे मोठ्या प्रमाणे प्रतिसाद मिळाला. शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक व माजी नगरसेवक मोईन मास्टर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.या रक्तदान शिबीरात शेकडोच्या संख्येने लोकांनी रक्तदान केले. यावेळी डॉ माजेद काझी, डॉ शकील शेख आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे कामरान खान, शैख वासिम, ॲडवोकेट मुस्सविर, मोमीन फेरोज व ईतर सदस्यांनी रक्तदान केले. शिबिरास भेटलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे शाखा प्रमुखांनी सर्व जनतेचे मनापासून आभार व्यक्त केले आणि यापुढेही संघटना सदैव अशीच लोकहिताची कामे करत राहिल याचे आश्वासन दिले.








