मुस्लिम आरक्षण समन्वय संघर्ष समितीच्या वतीने आ सुरेश धसांचा किल्ले धारूर शहरात फटाके वाजून सत्कार

मुस्लिम आरक्षण समन्वय संघर्ष समितीच्या वतीने आ सुरेश धसांचा किल्ले धारूर शहरात फटाके वाजून सत्कार
किल्लेधारूर/प्रतिनिधी
सध्या महारष्ट्र राज्यात सर्वत्र मुस्लिम आरक्षण निर्णायक आंदोलनाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात विभागीय स्तरावरून जिल्हा स्तरावरून व तालुका स्तरावरून
आपापल्या मतदार संघाचे खासदार,पालकमंत्री,आमदार, महापौर,
नगर अध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष,सदस्य,सरपंच,
यांच्या माध्यामातून मा.मुख्यमंत्री महोदयांना मुस्लिम आरक्षण मागणीचे निवेदन देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून,तालुक्यातून,आमदार खासदार यांना घेराव घालून निवेदन देण्यात येत आहे.त्यातच धारूर तालुका मुस्लिम आरक्षण समन्वय संघर्ष समितीच्या वतीने माजलगाव मतदार संघाचे आमदार प्रकाश सोळंके यांना ही आम्ही व माजलगाव मुस्लिम आरक्षण समन्वय संघर्ष समितीने निवेदन दिले होते.त्या वेळी आमदार महोदयांनी आमच्या या निवेदनाची दखल घेत आम्हाला तात्काळ मा.मुख्यमंत्री महारष्ट्र राज्य यांना पत्र पाठवून त्याची एक प्रत आम्हला देऊन माझा पूर्णपणे मुस्लिम आरक्षणाला पाठींबा असल्याचा शब्द दिला.
त्यातच दि.०२/१०/२०२० रोजी स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार सुरेश धस धारूर येथे आले अस्ता त्यांना ही मुस्लिम आरक्षण समन्वय संघर्ष समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले परंतु महोदयांनी कुठला ही उत्तर दिला नाही.
तरी मा आमदारांना विनंती की त्यांनी आमच्या मागणीचे निवेदन मा.मुख्यमंत्री महोदयाला देऊन मुस्लिम आरक्षणाची मागणी करावी.व त्या पाठवलेल्या पत्राची प्रत आम्हाला द्यावी.अशी मागणी मुस्लिम आरक्षण समन्वय संघर्ष समितीचे बीड जिल्हा उपाध्यक्ष मूजाहेद मोमीन,माजी नगरसेवक शेख फासियोद्दीन,मुस्लिम आरक्षण समन्वय समितीचे तालुका अध्यक्ष अतीक मोमीन,शहर अध्यक्ष शेख सिद्दिक,अफसर पठाण,ताहीर शाह,अमजद शाह,मूबिन सहाब,सय्यद फेरोज,शेख सोहेल,राहील जरगर,सरफराज खूरेशि,मोमीन अली,युसुफ जरगर,मोमीन नौशाद,शेख इम्रान,शेख सिद्दिक,शेख अश्फाक,शेख नदीम,शेख एजाज,शेख कलीम,शेख असलम व सर्व मुस्लिम समजाच्या वतीने मागणी करण्यात आली आहे.








