ए.टी.एम वाटप झाले असेल तर आता बँकेंचे व्यवहार सुरळीत करा

ए.टी.एम वाटप झाले असेल तर आता बँकेंचे व्यवहार सुरळीत करा
प्रा. ईश्वर मुंडे यांचा बँक संचालकांना टोला
किल्लेधारुर/प्रतिनिधी
जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणजे गोर गरिब जनतेची जीवनदायीनी असते. तिला राजकीय ग्रहण लागल्यामुळे गोर गरिब जनता फरपटत आहे. सध्या तर बँकेत नाही आणा.. ए टी एमआम्ही दिले म्हणा.. असे जोरादार काम चालू आहे.
ए टी एम कार्ड वाटप च्या नावाखाली राजकीय कार्यक्रम घेण्यात जिल्हा बँकेचे संचालक व इतर पदाधिकारी गुंग आहेत. जर आता कार्ड वाटप करण्याचे झाले असेल तर बँकेचे व्यवहार सुरळीत करावेत. गोर गरीब जनतेची बँक त्रासातून सुटका करावी असा टोला प्रा.ईश्वर मुंडे, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ता.धारूर यांनी बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकांना लावला आहे.
पुढे प्रा. ईश्वर मुंडे म्हणाले, कधी बँकेचे नेट संपले, कधी मॅनेजर नाहीत, कधी कर्मचारी नाहीत तर कधी पैसे नाहीत या सबबी खाली सर्वसाधारण खातेदार व शेतकऱ्यांना सतत त्रास होत आहे. कांही लोकांना बँकेत जाऊन पैसे मिळत नाहीत कांही लोकांना घरपोच पैसे पोच होतात.शाखाधिकारी इतरञ बसून बँकेचे व्यवहार करतात अशी ही तक्रार खातेदार व शेतकरी आमच्याकडे तक्रारी करत आहेत.
तरी बँकेचे अध्यक्ष व संचालक मंडळींनी लक्ष देवून धारूर व परिसरातील बँक व्यवहार सुरळीत करावेत अन्यथा तुम्ही एटीएम वाटप करा आम्ही एटीएम परत करण्याचे कार्यक्रम घेवू असा ईशारा ही प्रा.ईश्वर मुंडे यांनी दिला आहे.








