स्वच्छेते चा गाजावाजा करणारी गेवराई नगर परिषद लोकांच्या जीवाशी खेळत आहे

Beed

स्वच्छेते चा गाजावाजा करणारी गेवराई नगर परिषद लोकांच्या जीवाशी खेळत आहे

वार्ड क्रमांक ९  दारुलउलूम तय्यब नगर  या भागात उमर फारूक मस्जिद तय्यब नगर  व नूरजहां मस्जिद  कड़े जाणाऱ्या  रस्त्याची दुर्दषा:-सय्यद अल्ताफ 

गेवराई/प्रतिनिधी 

दारुलउलूम तय्यब नगर  या भागात वार्ड क्रमांक ९ मध्ये  उमर फारूक मस्जिद तय्यब नगर  व नूरजहां मस्जिद कड़े जाणाऱ्या  रस्त्याची दुर्दषा रस्त्यावर पावसामुळे मोठमोठेखड्डे झाले असुन या खड्यात पावसाचा पाणी साठा मोठ्या प्रमाणावर तयार झालेला आहे.

नागरिकांना जाण्या-येण्यासाठी त्रास होत आहे लोकांनी वारंवार  नगरसेवकाला सांगितले तरी नगरसेवक यांच्या समस्येचा काहीच फरक पडत नाही मग नगर सेवक फक्त नावा पुरतेच का? असा प्रश्न नागरीकांना निर्माण झाला आहे.

एवढांच नव्हे तर गटार सुद्धा वेळेवर स्वच्छ होत नाही ना साफ होते लोकांनी घरचा कचरा कुठे टाकावे असा प्रश्न पडतो कुठे ही टाकला तर तो फिरून घरा समोरच येतो व नाल्या कचर्याने गच्च होतात  तरी स्थानिक नगर सेवकाला काहीच फरक पडत नाही? नगर सेवक फक्त मतदानाच्या वेळेसच जागा होतो का? असा सवाल उपस्थित होतो .
काही भागा मधे लोकांच्या घरा पुढे गटार नाही लिकानी घरा समोर सौच खड्डे तयार केले ते पन पूर्ण पने भरले असून परिसरात दुर्घन्धी पसरली आहे आणि तेथे डास मोठ्या प्रमाणावर निर्माण झाले आहे.लोकांना डास चावल्या मुळे जर मलेरिया झाले किंवा ताप आली तर कोरोना पॉजिटिव नकारता येत नाही ? गेवराई नगर परिषद का लोकांच्या आरोग्यशी खेळत आहे ?
 
नगर सेवक साहेब आम्ही माणसंच आहोत,लक्षात राहील सर्व काही स्थानिक नागरीकांचा आक्रोश 
 
सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आज कोरोना सारख्या  आपत्तीला लढण्यासाठी  प्रशासन कठोर  प्रयत्न करत आहे  जागोजागी  स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे परंतु याठिकाणी गेवराई तय्यब नगर भागात वार्ड क्रमांक ९ मध्ये कसलीच स्वच्छता दिसत नाही ना नगराध्यक्ष ला नाही नगर सेवकला ना आमदाराला अता स्थानिक नागरीक  जिल्हाधिकारी  राहुल रेखावर यांच्या कडे तक्रार करणार आहे  व लोकांकडून मागणी होत आहे की त्यांनी वार्ड क्रं.९ मध्ये येऊन स्वतः पाहणी करावी.

Sharing

Visitor Counter