राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या आढावा बैठकीस उपस्थित रहा-धनंजय शिंदे -सुशिलकुमार चाटे

Beed

राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या आढावा बैठकीस उपस्थित रहा-धनंजय शिंदे -सुशिलकुमार चाटे

अंबाजोगाई/प्रतिनिधी 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार साहेब,राष्ट्रवादी जेष्ठ नेते व ओबीसी नेते मंत्री ना. छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या सूचनेवरून बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजयजी मुंडे साहेब, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेब, ईश्वर भाऊ बाळबुधे साहेब व बीड जिल्हा परिषद अध्यक्षा शिवकन्याताई सिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या जिल्ह्यातील ओबीसी पदाधिकारी, तालुका व जिल्हा कार्यकारणी, तसेच प्रमुख कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण आढावा बैठक जिल्हा कार्यालय राष्ट्रवादी भवन बीड येथे दिनांक 07.10.20 रोजी बुधवार सायंकाळी 4 वाजता या दिवशी आयोजित केली आहे तरी या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेल अंबाजोगाई तालुकाध्यक्ष धनंजय शिंदे व जिल्हा उपाध्यक्ष सुशिलकुमार चाटे यांनी सर्व पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
या बैठकीस जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या अध्यक्ष ते खाली होणार असून बीडचे आमदार संदीपभैय्या क्षीरसागर, अँड सुभाष राऊत (विभागीय अध्यक्ष समता परिषद) जिल्हा परिषद सभापती जयसिंग भैय्या सोळंके व जि.प.समाज कल्याण सभापती कल्याण अबुज, मीनाक्षी ताई डमाळे,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. शिवाजी राऊत साहेब जिल्हा प्रभारी म्हणून व जालना येथील सिनेट सदस्य प्रा. संजय काळबांडे सर यांची निरीक्षक म्हणुन तर परभणी, जिल्हापरिषद सदस्य नानासाहेब राऊत उपस्थित राहणार आहेत. तरी या आढावा बैठकीस सर्वांनी वेळे वर उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे बीड जिल्हा उपाध्यक्ष सुशिलकुमार चाटे व अंबाजोगाई तालुकाध्यक्ष धनंजय शिंदे यांनी केले आहे.

Sharing

Visitor Counter