पीक कर्ज वाटप न करणाऱ्या बँकेविरोधात आंदोलनात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे - सुग्रीव लाखे

Beed

पीक कर्ज वाटप न करणाऱ्या बँकेविरोधात आंदोलनात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे - सुग्रीव लाखे

 गेवराई/प्रतिनिधी 

तालुक्यातील महाराष्ट्र ग्रामीण बँक,पाडळसिंगी येथे शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज देण्यास नकार दिला असून,याविरोधात सामाजिक कार्येकर्ते दत्ता जाधव यांनी दि.८ ऑक्टोबर रोजी बँकेसमोर आंदोलनाचे आवाहन केले असून,पीक कर्ज वाटप न करणाऱ्या बँकेविरोधात या आंदोलनात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शेकाप युवानेते सुग्रीव लाखे यांनी केले आहे.                                                                                            महाराष्ट्र ग्रामीण बँक पाडळसिंगी येथे पीक कर्ज माफीत आलेल्या शेतकऱ्यांनाही देखील अद्याप पीक कर्ज वाटप केलेले नाही.अनेक शेतकरी या पीक कर्जपासून वंचित राहिलेले आहेत.आताच अतिवृष्टी झाल्याने शेतकरी हवालादिल झालेला असून,उधार आणलेले बियाणे व खताचे पैसे कसे द्यायचे.? या चिंतेत आहे.शासन पीक वितरण तात्काळ करा म्हणून आदेश देतात परंतु शाखा व्यवस्थापक त्या आदेशाला जुमानत नाहीत.तरी या शाखा व्यवस्थापकांनी तात्काळ नवीन व जुने शेतकरी खातेदारांना पीक कर्ज वितरण करावे नसता बँकेसमोर लोकशाही मार्गाने उपोषण करण्यात येईल,तरी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सुग्रीव लाखे यांनी केले आहे.

Sharing

Visitor Counter