मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा-अशोक हिंगे

Beed

मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा-अशोक हिंगे 

जिल्हाधिकारी यांना निवेदन केले सादर

वडवणी/दत्ता करडे

आगोदरच कोरोना लॉकडाऊन मुळे सर्वसामान्यांचे व शेतकरी वर्गाचे कंबरडे मोडले असताना या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे आता हाता तोंडाला आलेला घास गेला आहे व चालू खरीप हंगामातील पिंकाचे मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात नुकसान झाले आहे अजूनही शेता मध्ये पाच ते सहा फुटापर्यंत पाणी साचले आहे. याचा रब्बीच्या पेरण्यालाही धोका होऊ शकतो फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे शेतकरी वर्ग कर्जबाजारी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली तेव्हा अशा स्वरूपात शेतकरी वर्ग या संकटातून सावरण्यासाठी मराठवाडा भागात ओला दुष्काळ जाहीर करावा व झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीचे निवेदन बीड जिल्हा अधिकारी यांना वंचीत बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले यावेळी बबन वाडमारे, डॉ. नितीन सोनवणे जिल्हाउपाध्यक्ष संतोष जोगदंड, खंडू जाधव ज्ञानेश्वर कवठेकर, अनंतराव सरवदे,अजय सरवदे,पुष्पा तुरूंकमारे,संदीप जाधव,गणेश शिंदे,श्रीकांत वाघमारे,डॉ.गणेश खेमाडे,किशोर बोले,भाऊसाहेब चक्रे,आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sharing

Visitor Counter