मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा, वंचित बहुजन आघाडीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा, वंचित बहुजन आघाडीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
अंबड / प्रतिनिधी
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. उद्धवजी ठाकरे यांना अंबडचे तहसीलदार यांच्या मार्फत आज सकाळी ११.०० वा.एक लेखी निवेदन देण्यात आले, त्यात जालना जिल्हा सह मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे खरीप हंगामी पिकाचे नुकसान झाले आहे. अजूनही शेतात पाच ते दहा फुटापर्यंत पाणी साचलेले आहे त्यामुळे रब्बीच्याही पेरणीला धोका होऊ शकतो शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. तेव्हा सरकारने मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे ता.अध्यक्ष भालचंद्र भोजने, जिल्हा उपाध्यक्ष सतीश खरात, विष्णुकुमार शेळके, चंद्रकांत कारके, सुभाष ससाने, राजू वाडेकर, बाबासाहेब देवडे, मनोहर खरात, बाबासाहेब साळवे, भगवान जाधव, राहुल कारके, आकाश पांजगे, कैलास पवार, यांच्यासह मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.








