जिल्हा कोविड रूग्णालयाची सुरक्षा सुधरणार कधी?

जिल्हा कोविड रूग्णालयाची सुरक्षा सुधरणार कधी?
कोविड वार्डात नातेवाईकांचा सर्रास वावर, सुरक्षा गार्डसह पोलीसांची बघायची भुमिका!
जिल्हा अधिकार्याच्या आदेशाला केराची टोपली,जिल्हा अधिकारी आले तर कडक बंदोबस्त,गेले की जैसे थे तैसे!
जिल्हा चिकित्सकाच्या राऊंडच्या वेळेस नातेवाईकाला बाहेर करणे कितपत योग्य?
रूग्णांकडुन माहिती व सुविधा बद्दल माहिती घेता किती तरी रूग्णाला बोलताच येत नाही मग त्यांची माहिती कशी घेणार?
बीड/प्रतिनिधी
बीड जिल्हा रूग्णालयात भोंगळ कारभार! चव्हाट्यावर येत आहे उपचारादरम्यान एका रुग्णाचा मयत झाल्यानंतर नातेवाईकांनी गोंधळ घालत साहित्याची तोडफोड करत डॉक्टरांना धक्का बुुक्ककी केली यानंतर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बीड जिल्हा कोविड सेंटरला भेट देत सुरक्षा व्यवस्था तगडी करण्याचे आदेश दिले मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देताना बंदोबस्त कडक करण्यात आले परंतु आज सकाळी अशी अवस्था पहावयास मिळाली यातून निदर्शनास येते की अधिकाऱ्यांच्या भेटी वेळेस सुरक्षा व्यवस्थेकडून बंदोबस्त केला जात असून पुन्हा सुरक्षा रामभरोसे ठेवत रुग्णांच्या नातेवाइकांना वार्डात सर्रास वावर दिला जात असल्याचे दिसून येत आहे.
बीड जिल्ह्या रूग्णालयात काल झालेल्या प्रकारामुळे बीड शहरातील नागरीकात वेगवेगळ्या प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. काल झालेला मयत स्वतःहून बाथरूम ला जाताना पाय घसरून पडल्याने मृत्यु झाल्याची? धक्कादायक घटना समोर आली आहे.सुत्रा कडुन मिळालेली माहिती अशी की काल रात्री 9 च्या सुमारास वार्ड क्र.७ मध्ये उपचार घेत असताना मयत व्यक्ती वय अंदाजे ७० हा व्यक्ती स्वतःहून बाथरूम ला गेला असता पाय घसरून पडल्याने त्याचा मृत्यू झाला?असा आरोप करत नातेवाईकांकडुन गोंधळ घालण्यात आलं.अशी घटना घडत असताना तेथील क्रर्मचारी वार्ड बाय करतात काय? असा प्रश्न नागरिकांना निर्माण होत आहे.प्रशासनाने प्रत्येक वार्डात कर्मचार्यांची नेमणूक केली आहे तरी पण या ठीकाणी कर्मचार्यांचा गलथान कारभार!दिसत आहे.अनेकदा नातेवाईकांनी तक्रार करून प्रशासन दखल का घेत नाही?असा प्रकार घडण्याची वाट बघत होते का?असा प्रश्न उपस्थित होतो.








