अत्याचार प्रकरणात कठोर कारवाई करा-आरसा फाऊंडेशनचे निवेदन

Beed

अत्याचार प्रकरणात कठोर कारवाई करा-आरसा फाऊंडेशनचे निवेदन

बीड/प्रतिनिधी 

उत्तर प्रदेश  (हाथरस)मध्ये   मुलीवर सामुहीक आत्याचार झाला  मुलीची जीभ कापून , मारहाण करण्यात आली त्यात तिच्या पाठीचा मणका  मोडला रक्तबंबाळ अवस्थेत तिला तिच्या कुटुंबियांनी  दवाखान्यात नेले ही घटना दिनांक14/09/2020 रोजी . 
घडली, दरम्यान तिचा दिल्लीतील   रुग्णालयात उपचारादरम्यान     दि.२९/०९/२०२० मृत्यु झाला. अशा कृत्याची तेथील प्रशासनाने ताबडतोब दखल घेणे आवश्यक होते. परंतु तसे झाले नाही,गृहखात्याने  सदर प्रकरणाची दखल घेणे अत्यंत आवश्यक आहे.

आपल्या देशामध्ये दिवसेंदिवस महिलांवर होणारे अत्याचार, अन्याय, बलात्कार, छेडछाड सारख्या घटणेचे प्रमाण वाढतच आहे. ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडु नये म्हणुन केंद्र सरकार व प्रत्येक राज्याच्या राज्य सरकार यांनी स्थानीक पातळीवर  उपाययोजना करणे खुप गरजेचे  आहे व या अशा घटना घडु नये यासाठी नराधमांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी. इतर ही प्रलंबीत  खटले जलद गती न्यायालयात चालवुन पिडीत कुटुंबाला व पुर्ण देशातील पिडीत  महिलांना न्याय देण्यात यावा आपल्या देशामध्ये बलात्काराच्या प्रकरणात पिडीता व आरोपी यांची जात पाहुन प्रकरण हाताळल्या जाते या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो तरी प्रत्येक केस मध्ये कुठल्याही प्रकारचे राजकीय किंवा सामाजिक हस्तक्षेप शिवाय निष्पक्ष  न्याय देण्यात यावा ही आरसा फाऊंडेशनच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी करण्यात येत आहे.सदर निवेदन मा. अमित शाह गृहमंत्री भारत सरकार यांना जिल्हाधिकारी बीड मार्फत आरसा   आरसा फौंडेशन च्या  सुजाता मोराळे, मंगल मारगुडे,अर्चना सानप,  यांनी जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे दिले.

Sharing

Visitor Counter