बीड जिल्ह्यामध्ये ओबिसी संघटन मजबूत करणार-जिल्हा उपाध्यक्ष विष्णु राऊत

बीड जिल्ह्यामध्ये ओबिसी संघटन मजबूत करणार-जिल्हा उपाध्यक्ष विष्णु राऊत
गेवराई येथील केकतपांगरी चे धडाडीचे कार्यकर्ते विष्णु राउत हे आज.बोलताना म्हटले.
गेवराई/वार्ताहर
मा.शरद पवार साहेब,मा.जयंतदादा पाटिल.मा.धनजंय मुंडे साहेब व प्रदेश अध्यक्ष इश्वर बाळबुधे यांच्या सुचनेनुसार मराठवाड्यातील आढावा बैठकी सुरू आहेत.आज बीड जिल्हा आढावा बैठक राष्ट्रवादी भवनात संपन्न झाली.विविध विषयावर चर्चा झाली . बैठकीसाठी मराठवाडा प्रभारी.मा डॉ. शिवाजीभाऊ राऊत,मा.संजय काळबांडे निरीक्षक नानासाहेब राऊत सहनिरीक्षक , मिनाक्षी ताई देवकाते व जिल्हा अध्यक्ष रुक्मानंद खेत्रे.जिल्हा उपाध्यक्ष विष्णु राउत.अंबाजोगाई चे लोकप्रिय अध्यक्ष धनंजय शिंदे उपस्थित होते.विविध विषयावर चर्चा झाली.जिल्हा अध्यक्ष यांनी चर्चा करून विविध ठरावाचे वाचन करून मान्यवरांकडे सुपुर्द केले.बैठकित विविध पदाच्या नियुक्ती करण्यात आली.यावेळी विष्णु राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त केले.आपण आता जि संधी मिळाली आहे यात आता बीड जिल्ह्यामध्ये संघटना मजबूत करण्यासाठी अहोरात्र मेहनत करू.तळागाळात संघटना व संघटनेची ध्येय धोरणे रूजवणार आहोत. कार्यक्रमा प्रास्ताविक व सूत्रसंचालन अध्यक्ष रुक्मानंद खेत्रे यांनी केले.








