ओबीसी तरूणांना उद्योग उभारण्यासाठी सहकार्य करण्याचा मानस - ईश्वर बाळबुधे

Beed

ओबीसी तरूणांना उद्योग उभारण्यासाठी सहकार्य करण्याचा मानस - ईश्वर बाळबुधे 

वर्धा/वार्ताहर 

राष्ट्रवादी पक्ष कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल कार्यकारिणीची आढावा बैठक संपन्न झाली. ओबीसी घटकातील विविध समाज बांधवांची आज नियुक्ती करण्यात आली. बैठकीला प्रमुख पाहुणे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, माजी आ राजू तिमांडे, महाज्योती संचालक सदस्य प्रा दिवाकर गमे, प्रदेश सरचिटणीस अभिजीत फालके, प्रभारी डाॅ विलास मुर्ती, निरिक्षक अविनाश गोतमारे, जिल्हाध्यक्ष हरिष काळे, निलकंठ पिसे, विनय डहाके उपस्थित होते. याप्रसंगी ग्रामीण भागातील तालुका अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ता उपस्थित होते.

Sharing

Visitor Counter