योगी सरकारचा पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाला बदनाम करण्याचा डाव

Beed

योगी सरकारचा पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाला बदनाम करण्याचा डाव

बीड/प्रतिनिधी 

उत्तर प्रदेश सरकार हाथरस गँगरेप प्रकरणात पूर्णतः अपयशी ठरलेली  आहे या अपयशास लपवण्यासाठी योगी सरकार पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया या सामाजिक संघटनेवर तथ्यहीन आरोप लावत असून सर्व समाचार माध्यमांचं व जनतेचे लक्ष हाथरस गँगरेप प्रकरणातून विचलित करण्यासाठी अशा बिनबुडाच्या आरोप करून उत्तर प्रदेश सरकारचा उत्तर प्रदेश पोलिसांचा हलगर्जीपणा आणि नाकर्तेपणा लपवत आहे.उत्तर प्रदेश सरकार ही राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यात सपशेल अपयशी ठरलेले आहे आणि सरकारचे जातीयवाद्यांना जोपासणारी मानसिकता हाथरस प्रकरणातील पीडित परिवाराबरोबर झालेले अत्याचार यावरून दिसून येते .पण जेव्हा सर्व समाचार माध्यमांद्वारे हे प्रकरण प्रकाशित झाल्याने  व जनतेचा रोष बघता उत्तर प्रदेश सरकार निरागस लोकांवर खोटे आरोप करून मुख्य मुद्द्यावरून जनतेचे लक्ष वळविण्याचा प्रयत्न करत आहे .
    या प्रकरणातील सत्यता अशी की हाथरस पीडित परिवाराची भेट घेण्यासाठी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी व युनियन वर्किंग जर्नलिस्टचे सचिव सिद्दीक कापान जात असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी यांना अटक करून यांच्यावर हिंसा भडकावण्याच्या उद्देशाने जात आहे असे खोटे व बिनबुडाचे आरोप लावले. या सर्व खोट्या आरोपांचे पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियातर्फे खंडन करण्यात आले असुन देशभरात या कारवाईबद्दल पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया तर्फे आंदोलन करण्यात आले. 
             
बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बीड पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या पदाधिकार्यांकडुुन आंदोलन करण्यात आले आणि  जिल्हाधिकारी साहेबांना याविषयी निवेदन दिले व उत्तर प्रदेश सरकारकडून निर्दोष लोकांवर कारवाई मागे घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

Sharing

Visitor Counter