वडवणीत भाजपचे निषेध आंदोलन संपन्न

Beed

वडवणीत भाजपचे निषेध आंदोलन संपन्न

वडवणी/दत्ता करडे

देशाचे पंतप्रधान नरेंद्रजीव आमुलाग्र बदल घडवणारे क्रांतिकारक पाऊल उचलले आहे तरी राज्यातील महाआघाडी सरकारने केंद्र सरकारच्या या निर्णयाच्या अंमलबजावणी स्थगिती दिलेली आहे तरी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, प्रदेश उपाध्यक्ष खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या आदेशाने व जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली वडवणी तालुका भाजपच्या वतीने तहसील कार्यालया समोर निषेध आंदोलन करण्यात आले.
नरेंद्रजी मोदी यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे क्रषी विधेयक मंजूर केलेले आहे तरी यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे परंतु राज्यातील महाआघाडी सरकारने राजकीय व्देषातुन या विधेयकाची अंमलबजावणी करण्यासाठी विरोध केलेला आहे तरी यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे तरी याचा वडवणी तालुका भाजपच्या वतीने निषेध करून मा.पंकजाताई मुंडे, खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या आदेशाने व जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालया समोर महाआघाडी सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष पोपटराव शेंडगे, सरपंच संघटनेचे ता.अध्यक्ष संजय आंधळे, युवा नेते बाबरी मुंडे, मच्छिंद्र झाटे,रामेश्वरम सावंत, शिवाजी तौर,अँड. प्रदिप शेळके, सरपंच बालासाहेब राऊत, अंकुश वारे,ईश्वर तांबडे, श्रीमंत मुंडे, महादेव सावंत ,महादेव शेंडगे, सुग्रीव मुंडे, गोविंद अंबुरे यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sharing

Visitor Counter