10 आक्टोबर "जागतिक बेघर दिन"निमित्ताने बेघर निवाराकेन्दात स्वच्छता मोहीम आणि विविध कार्यक्रम साजरे

Beed

10 आक्टोबर "जागतिक बेघर दिन"निमित्ताने बेघर निवाराकेन्दात स्वच्छता मोहीम आणि विविध कार्यक्रम साजरे

बीड/प्रतिनिधी 

जिव्हाळा बेघर निवाराकेन्द,बीड. येथे अनाथ, दिव्यांग, बेघर महिला, पुरुष यांची निवारा आणि भोजनाची व्यवस्था मागील तीन वर्षांपासून नगर परिषद बीड आणि रेणुका सेवाभावी संस्था बीड यांच्या माध्यमातून केली जात आहे .येत्या 10 आक्टोबर रोजी world Homeless Day जागतिक बेघर दिवस साजरा केला जाणार आहे.मागील 01 अक्टो.पासुन निवाराकेन्दात विविध उपक्रम राबविले जात आहेत. निवाराकेन्दाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. सर्व बेघरांची दाडी कटींग, आणि त्यांना आंघोळ घालून, वैयक्तिक स्वच्छता करण्यात आली शिवाय सर्वांना मास्क आणि सँनिटायझर वाटप करण्यात आले. तसेच महिला बचत गटांना, पोलीस प्रशासन, विविध सामाजिक संस्थाना आमंत्रित करण्यात आले तसेच निवाराकेन्दात वाढदिवस, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले. फळ वाटप,अन्न दान,करण्यात आले .समाजातील नागरिकांनी बेघर, अनाथ सर्व लाभार्थ्यांना जे प्रेम माया दिली त्यामुळे सर्व लाभार्थी भारावून गेले. जसे आपल्या कडे मदर डे,फादर डे,डॉक्टर डे ,सिस्टर डे साजरे केले जातात त्याचप्रमाणे आम्हा भिकारी, बेघर, अनाथासठीचा सुद्धा वर्षातुन एक दिवस साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे निवाराकेन्दातील सर्व जन आनंदीत आहेत. सर्व कर्मचारी देखील मनापासून काम करत आहेत. या कार्यक्रमासाठी बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. राहुल रेखावार यांनी सुद्धा येण्याचे आश्वासन दिले आहे.निवाराकेन्दाचे व्यवस्थापक राजु वंजारे ,अभिजित वैद्य, शालीनी परदेशी, रमेश वीर ,यश वंजारे सर्व जन 10 आक्टो, जागतिक बेघर दिनाच्या निमित्ताने परिश्रम घेत आहेत.

Sharing

Visitor Counter