एकल महिला संघटना च्या महिलांनी हाथरस येथील मुलीला न्याय मागण्यासाठी निषेध व्यक्त केला

एकल महिला संघटना च्या महिलांनी हाथरस येथील मुलीला न्याय मागण्यासाठी निषेध व्यक्त केला
बीड/प्रतिनिधी
एकल महिला संघटना च्या गावातील महिलांनी आपल्या गावात ग्रामपंचायत समोर मनीषा वाल्मिकी हिला न्याय मिळावा यासाठी निषेध व्यक्त केला. उत्तर प्रदेश हाथरस येथील मनीषा वाल्मिकी वर चार नराधमांनी अत्याचार केला, व तिने बोलू नये, कुणाला काही सांगू नये म्हणून तिची जीभ कापली, तिचा मणका मोडून तिला अपंग केले इतकेच करून ही तिला प्रशासनाची मदत वेळेवर मिळाली नाही व तिचा 29-09-2020 रोजी मृत्यू झाला. आजही न्याय व्यवस्था महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी असमर्थ ठरली. व तिच्या कुटुंबातील सदस्य मदत व्हावी, व नराधमांना तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी.यासाठी बीड तालुक्यातील पालवन, घाटसावळी, नेकनूर, भाळवणी, डोकेवाडा, पाटोदा बेलखंडी, मांजर सुमभा,ससेवाडी, बहिरवाडी, आहेरवडगाव, तळेगाव,उमरद खालसा, सावंतवाडी, पांढऱ्याचीवाडी, येलंबघाट,कोळवाडी, सफेपुर, खर्डेवाडी येथील महिला मुली, मुले, पुरुष यांनी हा निषेध नोंदवला.








