सरकार झोपेचे सोंग घेत असेल पण जिल्ह्यातील विरोधी पक्षाने झोपी जाऊ नये-ज्ञानेश्वर गवळी

Beed

सरकार झोपेचे सोंग घेत असेल पण जिल्ह्यातील विरोधी पक्षाने झोपी जाऊ नये-ज्ञानेश्वर गवळी 

वडवणी/दत्ता करडे

खरीप हंगाम २०२०  मध्ये जुनच्या पहिल्याच आठवड्यात पाऊस झाल्याने सर्व पेरण्या मृग नक्षत्रात झाल्यानें सोयाबीन, कापूस,तुर इत्यादी . पिकांची चांगली उगवण झाली व पिकें ही जोरदार आली होती.पिके चांगले दिसत असल्याने शेतकरी हि कष्टाला व शेती खर्च करण्यात मागे सरत नव्हता.मध्यंतरी नविन पिंक कर्ज वाटप झाल्याने शेतकर्यांनी पिकांसाठी चांगल्या दर्जाचे खत व फवारणी औषध वापरुन पिके चांगली आणली होती. यासाठी काही शेतकऱ्यांनी उसने तर काहींने व्याजांनी पैसे काढून पिकांसाठी खर्च केला व पिकें ही जुलै -ऑगस्ट मध्ये चांगल्या स्थितीत होते.त्यामुळे शेतकऱ्यांनी खर्चास हाईगाई केली नाही.परंतु मध्यंतरी सप्टेंबर अखेरीस सतत १५ दिवस पाऊस बरसल्याने सोयाबीन, कापूस,तुर इत्यादी पिकांचे नातोनात नुकसान झाले.यात प्रशासनाने पंचनामे केली.परंतु नुकसान भरपाईपोटी भ्र शब्द देखील काढला नाही.आज सोयाबीन पीक काढणीला आले आहे.परंतु पाऊसामुळे ते काढणे शक्य होत नाही.मागील पाऊसात कापसाचे बोंडे जागीच नासले व काही बोंडे फुटले आहेत.मात्र ९ ऑ्क्टोबर पासुन सुरु झालेल्या पावसाने कापसाच्या वाती होण्याची वेळ आली आहे.तर काही ठिकाणी फुटलेल्या कापसामध्ये जागीच सरकीला कोंब फुटत आहे.झालेला खर्च निघणे ही शेतकऱ्यांला अवघड झाले आहे.तोंडाला आलेला घास पाऊसाने हिरावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.यात सरकारचे साफ दुर्लक्ष असुन बीड जिल्ह्यातील विरोधी पक्षही बघ्याची भूमिका घेतांना दिसून येत आहे.सरकाने व बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी जिल्हा व तालुका प्रशासनांस तात्काळ पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यास आदेश द्यावे.व नुकसान भरपाईपोटी हेक्टरी ५०,००० रुपये अनुदान द्यावे व बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा.अशी मागणी देवगावचे युवक शेतकरी ज्ञानेश्वर गवळी यांनी केली आहे.

Sharing

Visitor Counter