मिनाक्षी देवकते यांची सामाजिक बांधिलकी!

मिनाक्षी देवकते यांची सामाजिक बांधिलकी!
बीड/प्रतिनिधी
ज्या समाजात आपला जन्म झाला या समाजाचं आपण काहीना काही देणे लागतो. केवळ सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून महिलांसाठी सातत्याने वेगवेगळे उपक्रम राबविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल प्रदेश संघटन सदस्य मीनाक्षीताई देवकते यांनी समाजातील गरजवंत लोकांना नेहमीच आपला मदतीचा हात पुढे केला आहे. समाजातील दीनदुबळ्या गरीब वंचित लोकांना केवळ अन्नधान्याची मदत नाही, तर बीड जिल्ह्यात सातत्याने महिलांवर होणार्या अन्याय आणि अत्याचार या संदर्भात त्या सातत्याने प्रयत्नशील असतात आज त्यांनी आपल्या परिसरातील काही गरजू गरीब लोकांना अन्नधान्य देऊन अल्पशी मदत केली ,त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीची नेहमीच सर्व स्तरातून कौतुक होते आणि पुढे त्या असेही आवाहन करतात की ज्यांना मदत किंवा गरज लागेल अशांनी माझ्याशी संपर्क साधा समाजाच्या सेवेसाठी आपण सदैव तत्पर आहोत. मीनाक्षीताई यांच्या या सामाजिक सेवेच्या अखंड व्रताला सलाम.








