आडत मार्केट समोर च्या रोडची अवस्था बघून असं वाटतंय की, बीड शहरात थिगळे लावण्याचा कारभार चालू आहे!

आडत मार्केट समोर च्या रोडची अवस्था बघून असं वाटतंय की, बीड शहरात थिगळे लावण्याचा कारभार चालू आहे!
बीड/प्रतिनिधी
बीड शहरातील विकासाच्या नावाखाली केलेल्या कामांची पोल-खोल परतीच्या पावसाने चांगले उघडकीस आनुन दिले आहे. या ठिकाणी रस्त्याला मुरूमाचे ठिगळे लावून लोकांना मूर्ख बनवण्यात आलं आहे! अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.
बीड शहरातील काकू नाना आडत मार्केट समोर रस्त्याची बिकट अवस्था झाली असून याठिकाणी मोठाले खड्डे देखील रस्त्यावर झाले आहे बाहेरगावावरून शेतकरी तसेच मोठ्या वाहतूकांना या रस्त्याचं सामना करावा लागत आहे. बाहेरगावावरून येणारे शेतकरीत अशी चर्चा होते की असल्या रसत्याची अवस्थाआमच्या ग्रामीण भागाच्या रस्त्याची पण नाहीये! असं बोलल्यावर स्थानिक नागरीकांचा आक्रोश याठिकाणी पाहण्यास भेटत आहे किती दिवस असे टिगळे लावून लोकांना मूर्ख बनवणार? असा प्रश्न स्थानिक नागरीकांना निर्माण झाला आहे.
या रोडवर मोठमोठे खड्डे झालेले आहेत पण याठिकाणी फक्त मुरूम टाकण्यात आलं ते पण ज्या ठिकाणी मोठे खड्डे आहेत त्याच ठिकाणी मुरूम टाकलेलं आहे बाकी जसं होतं तसंच ठेवण्यात आलं.स्थानिक नागरिकांनी कितीतरी वेळा नगर अध्यक्ष व सि.ओ साहेब यांना तक्रार केली परंतु त्यांच्या कडून काहीच प्रतिउत्तर भेटत नसल्याने अता स्थानिक नागरिकांनी आपली मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडुन ठेवली आहेजिल्हाधिकार्यांनी या रस्त्याची पाहणी करून त्वरित या रस्त्याचे कामाचे आदेश द्यावेत अशी मागणी स्थानिक नागरिक व आडत मार्केट व्यापारी करत आहेत.








