किल्ले धारूर युथ क्लब ने राबवले श्री क्षेत्र अंबाचोंडी येथे स्वच्छता अभियान

Beed

किल्ले धारूर युथ क्लब ने राबवले श्री क्षेत्र अंबाचोंडी येथे स्वच्छता अभियान

धारूर /प्रतिनिधी

शहरालगतच्या डोंगर कुशीत वसलेले श्री क्षेत्र अंबाचोडी माता हे जागृत देवस्थान आहे . दरवर्षी नवरात्रात या ठिकाणी देवीची नऊ दिवस यात्रा असते .कोरोना कालावधीत लोकांची गर्दी कमी असली तरी निसर्गाचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक व भावीक येत आहेत .
शनिवार पासून सुरू होणाऱ्या या नवरात्र महोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर किल्ले धारूर युथ क्लब या सामाजिक संघटनेने श्री क्षेत्र अंबाचोडी येथे स्वच्छता अभियान राबवले , यामध्ये मंदीर परीसरामध्ये स्वच्छता करण्यात आली .
अनेक भावीकांनी टाकलेला कचरा , नारळाची टरफले , टाकून दिलेले खादय पदार्थाचे उरलेले अवशेष गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली .
तसेच मंदीरासमोर असलेल्या नदीच्या भागातील मोठया प्रमाणातील निरुपयोगी गवत काढण्यात आले यासाठी किल्ले धारूर युथ क्लब च्या सदस्या सोबत सकाळी स्नान करण्यास आलेल्या भाविकांनीही मदत केली .
हे स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी युथ क्लब अध्यक्ष सुरेश शिनगारे , सचिव अविनाश चिद्रवार , अनिल तिवारी , धनंजय भावठणकर, दत्तात्रय गोरे , दत्ता बनसोडे , कपिल समर्थ , महेश गवळी हे उपस्थित होते .श्री क्षेत्र अंबाचोंडी माता मंदीर परीसर स्वच्छ झाल्यामुळे मंदीराचे पुजारी शंकर गुरव यांनी समाधान व्यक्त केले .

Sharing

Visitor Counter