पिंपळनेर येथे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी

Beed

पिंपळनेर येथे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी

पिंपळनेर /वार्ताहर 

बीड तालुक्यातील पिंपळनेर येथील श्रीगणेश सार्वजनिक वाचनालयात मिसाईल मँन तथा माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच राजाभाऊ गवळी तर प्रमुख पाहूणे म्हणून सचिन सिरसट, बळीराम मेहत्रे, भागवत ठोकरे, विजय ठोकरे सह आदी उपस्थित होते. यावेळी प्रथम मान्यवरांच्या हस्ते कलाम यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यानंतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त करुन कलाम यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाला मच्छिंद्र साठे, गणेश ठोकरे सह वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sharing

Visitor Counter