महिला रिक्शा चालक यांना झालेल्या मारहाण प्रकरणी दोषीवर कार्यवाही करा

महिला रिक्शा चालक यांना झालेल्या मारहाण प्रकरणी दोषीवर कार्यवाही करा
वाहन चालक सुरक्षा कायदा आमलात आणावा
अंबड प्रतिनिधी/भागवत गावंडे
अंबड येथील तहसिलदार यांना संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेच्या वतीने निवेदन दिवा, ठाणे येथील महिला रिक्शा चालक शितलताई बनसोडे यांना झालेल्या मारहाण प्रकरणी दोषीवर कार्यवाही करण्यात यावी व भविष्यात आशा प्रकाराला आळा बसावा म्हणून वाहन चालक सुरक्षा कायदा आमलात आणावा आशा आशयाचे निवेदन आज दि.19/10/2020 जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. संजय माणिकराव हाळनोर यांच्या आदेश्याने अंबड येथे मा.श्री.तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे मराठवाडा अध्यक्ष दत्ता भाऊ जामकर,आतिष भाऊ जाधव अंबड ता.अध्यक्ष,राम भाऊ लहाने,हरिभाऊ जाधव,मारोती भाऊ कोळेकर,शुबास भाऊ चौरे,भारत खरात, सर्व जय संघर्ष चे वाहक चालक उपस्थित होते.








