नगर परिषद कार्यालयावर शेख शाहेद यांचा आत्मदहनाचा इशारा

नगर परिषद कार्यालयावर शेख शाहेद यांचा आत्मदहनाचा इशारा
किल्ले धारूर/प्रतिनिधी
किल्ले धारूर नगर परिषद हद्दीतील घर नं.४-७२चे पी.टी.आर. वर बोगस व बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंद न घेणे बाबत आक्षेप/उजर दारी अर्ज करून ही बे कायदेशीररीत्या घेतलेल्या नावाची नोंद कमी करून,नोंद घेतलेल्या संचकेची छायांकित प्रत मागणीचे निवेदन मुख्याधिकारी नगर परिषद किल्ले धारूर यांच्याकडे केले आहे.अन्यथा राष्ट्रवादी अल्पसंख्यांकचे शहराध्यक्ष शेख शाहेद हे दिनांक २६/१०/२०२० रोजी आत्मदहन करणार असल्याचा इशारा नगर परिषद कार्यालयाकडे दिलेल्या निवेदनात केला आहे.सदरील अर्जदाराने घर नं-४-७२ या जागेवर अनधिकृत व बोगस कागदपत्र आधारे लावण्यात आलेला शेख मुशिर शेख बशीर हा नाव कमी करण्यात यावे या मागणीचे निवेदन दिले आहे.शेख मुशिर शेख बशीर हा नाव कमी करण्यासाठी आत्मदहनकर्तेच्या भावाने वेळोवेळी आक्षेप अर्ज दिले व दिनांक ०८/०७/२०१९ रोजी सबंधित कार्यालयासमोर उपोषण देखील केले तरी सुध्दा नगर परिषद प्रशासनाने आपला मनमानी कारभार चालवला आहे.सदरील जागेवरून बोगस पद्घतीने लावलेला नाव कमी करावा व अर्जदाराला न्याय देऊन सहकार्य करावे अन्यथा पुढील घडणाऱ्या घटनेला सर्वस्वी नगर परिषद प्रशासन जबाबदार राहीन याची नोंद घ्यावी.








