सेंट अॅन्स सोशल सेंटर,सोबतच पाच संस्था मिळुन शिदोड गावात केली जनजागृती

सेंट अॅन्स सोशल सेंटर,सोबतच पाच संस्था मिळुन शिदोड गावात केली जनजागृती
बीड/प्रतिनिधी
ग्रामीण भागातील लोकांचे जीवन आणि आरोग्य याच्यांसाठी बीड शहरातील सेंट अॅन्स सोशल सेंटर एनजीओ ने मोठा पुढाकार घेऊन आपल्या सोबत रेणुका माऊली सेवाभावी संस्था,जय राणा महिला सेवाभावी संस्था,धर्मराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था,एकल महिला संघटना यांना आपल्या सोबत घेऊन बीड जिल्हा अधिकारी यांच्या सहकार्याने शिदोड गावाची निवड करून सर्व गावकऱ्यांना जन जागृत करण्याचा प्रकल्प ४ आँँक्टोबर पासून ते २३ ऑक्टोबर या दर्मियान सेंट अँन्स सोशल सेंटर केंद्राच्या सिस्टर अँनी जोसेफ, शालिनी परदेशी,बाबासाहेब कोकाटे, रुक्मिणी नागपुरे, राजू वंजारे,ललिता तांबारे ,अभिजीत वैद्य, मनीषा स्वामी,रेवती दीवार,ज्योती वाघमारे,पल्लवी खोब्रागडे,अविनाश राठोड,यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते यांनी पुढाकार घेवुन सर्वप्रथम या समितीने गावाचा सर्वे केला गाव हागणदारी मुक्त करण्यासाठी प्रयत्न केला,सर्व लोकांना प्रबोधन करून गावातील नागरिकांचे प्रश्न समजून घेतली, स्वच्छता आरोग्य, पिण्याचे पाणी, शौचालये, सांडपाणीची व्यवस्था,कचर्याची व्यवस्था,अशा अनेक प्रकारचे गाव पातळीवरील समस्या निकाली लावण्याचा प्रयत्न केला.
या गावाची मध्ये भागी असलेल्या नदीने दोन विभाग विभागणी केली होती .बिंदुसरेला मागे पूर आल्याने हे गाव दोन तुकड्यात विभागले गेले होते परंतु आज या ठीकाणी या शिबीरामुळे त्यांना एकत्र करण्यात आलं व सगळया गावंकर्यांचे बैठका घेऊन लोकांना प्रेरित केले गावकऱ्यांनी गाव स्वच्छता करण्याचे ठरवले आणि आज पूर्ण गावांमधून मोठ्या प्रमाणात साठलेला कचरा गोळा करूण एका मोठ्या खड्ड्यात कुजविण्यासाठी कचरा टाकण्यात आला.तसेच या गावात १००० विविध जातीची झाडे लावण्यात आल्या तसेच आज याठिकाणी आरोग्य शिबीराचे आयोजन करून डाॅ.ढगे वैद्यकीय अधिकारी पींपळनेर यांच्या मार्गदर्शनाखाली रितसर पने संपन्न झाला.
बीड शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शिदोड सारख्या ग्रामीण भागातील नागरिक, महिला, युवती यांच्या आरोग्य तपासणी आणी जनजागृती करण्याच्या उद्देशाने व एक समाज सेवा या उद्देशाने स्वखर्चाने या पाच संस्था मिळुन शिबीर शिदोड सारख्या गावाला सुशोभित,पथदर्शी प्रकल्प प्राथमिक स्वरूपात
करण्याचा प्रयत्न केला.
प्रकल्पाचा मुख्य उद्देश
जागतिक स्तरावरील महामारी (कॉविड- १९) याविषयी जनजागृती, महिलां, युुुवती यांच्या आरोग्य विषयी घ्यावयाची काळजी, आरोग्य विषयक शिबीर, कुपोषण बालसंगोपन याविषयी मार्गदर्शन व शासनाच्या विविध योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम या समितीच्या माध्यमातून होत आहे. ही समिती स्वयंप्रेरणेने आणि ग्रामीण भागातील महिला ,पुरुष ,युवक, यूवती आणि सरकारी अधिकारी, कर्मचारी आजी-माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आध्यात्मिक, कृषी सहाय्यक अंगणवाडी सेविका, मदतनीस, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, महिला बचतगट, वनपाल, वनरक्षक, पशुधन पर्यवेक्षक, स्वयंसेवक ग्रामपंचायत कर्मचारी संगणक परिचालक, ग्राम रोजगार सेवक, पोलीस पाटील, जलसुरक्षक, कृषी मित्र, या कार्यामध्ये सक्रिय असणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आलं आहे.








