यंदाची दिवाळी आदिवासी बांधवांसोबत...

Beed

यंदाची दिवाळी आदिवासी बांधवांसोबत...

बीड/प्रतिनिधी    

भारतीय संस्कृतीत दिवाळी सणाला अनन्यसाधारण महत्व आहे. दिवाळी सण हा प्रत्येक सधन/गरीब वर्गातील कुटुंब आपआपल्या मर्यादेनुसार साजरा करण्याचा प्रयत्न करीत असतात. परंतु 14412 चौ.कि.मी. विस्तीर्ण अशा दक्षिणोत्तर पसरलेल्या 76 टक्के वनव्याप्त, 1688 गावे ज्याची लोकसंख्या 11 लक्ष तसेच जि.प., खाजगी व्यवस्थापन, आदिवासी विकास विभाग तसेच समाज कल्याण विभागातर्फे चालविल्या जाणाऱ्या 511 माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय त्यामध्ये 1,15,570 विद्यार्थी/विद्यार्थिनी त्याचप्रमाणे 1641 प्राथमिक शाळा त्यामध्ये 73795 विद्यार्थी/विद्यार्थिनी शिक्षण घेत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी जनता हि अत्यंत हलाखीच्या स्थीतित प्रपंच भागवीत असतांना नक्षलवादाने होरपळलेली असल्याचे दिसून येते. त्यांना आपल्या तसेच कुटुंबाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी पाहिजे त्या प्रमाणात आर्थिक पाठबळ नाही. बहुतांश वेळा अर्ध नग्न  अवस्थेत राहणे भाग पडते. हा दीपोत्सव अंधार दूर करून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. याच्या प्रकाशाने  आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा उत्सव साजरा केला जातो. परंतु संपूर्ण महाराष्ट्र तव्दतच भारतभर दिवाळी सण साजरा होत असताना मात्र गडचिरोली जिल्ह्यातील जनता ही त्यांच्या आर्थिक विवंचनेमुळे कोणताही आनंदोत्सव साजरा करताना किंवा कोणत्याही सणाचा आस्वाद घेत असतांना दिसून येत नाही. 

        अशा हताश व आधुनिक युगापासून पिछाडलेल्या या समाजास प्रेमाची साद व मायेची फुंकर घालण्यासाठी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दल *यंदाची दिवाळी आदिवासी बांधवांसोबत*  हा उपक्रम राबवित आहे यास्तव एक माणुसकीचा हात अशा आदिवासी जनतेच्या पाठीशी राहावा या उदात्त हेतूने आपण स्थानिक नागरिक, लहान मुलांकरिता तसेच विद्यार्थी/विद्यार्थिनी करिता खालील प्रकारच्या साहित्यांची पूर्तता करून या आदिवासी बांधवांच्या आनंदात भर घालू शकता.

अ.क्र. वस्तूंचे नाव

1. नोटबुक, वह्या, पेन्सिल, इरेझर, शार्पनर, जेवणाचा डब्बा, दप्तर, कंपास, सोलर लॅम्प.

2. गादी (लहान मुलांसाठी), शर्ट/पॅन्ट पीस, धोतर, लोअर, टी शर्ट, साड्या, पातळ, टॉवेल, फ्रॉक, ल्यागिन, बांगड्या, चप्पल, शूज, स्पोर्ट टी शर्ट/पॅन्ट.

3. स्टील ,ग्लास ,गंज /पातेले ,डब्बे.

4. मिठाई ,सोनपापडी ,चिवडा ,फरसाण.

5. सामान्य ज्ञान पुस्तके ,कथा -कादंबऱ्या ,आत्मचरित्रावरील पुस्तके

6. क्रिकेट बॅट ,बॉल ,व्हालीबॉल ,फुटबॉल ,बॅडमिंटन , कॅरम बोर्ड , ,व्हालीबॉल/बॅडमिंटन नेट.

 

 *टीप* -

• वरील साहित्यासाठी रोख रक्कम न देता साहित्य स्वतः खरेदी करून द्यावे . 5

• वरील साहित्य जो कोणी आदिवासी बांधवांस देण्यास इच्छुक असेल त्यांनी खालील पत्यावर  ट्रान्सपोर्ट ने पाठवावे . जर आपणास शक्य नसेल तर कृपया खालील क्रमांकावर संपर्क साधावा . 

• आपण आपला लोगो ,नाव कपड्यावरती मुद्रित करू शकता .

• सदरचे साहित्य पोलीस  अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथे जमा करण्याची शेवटची दिनांक 12/11/2020

✦ *ट्रान्सपोर्ट करीता पत्ता :-* पोलीस अधीक्षक कार्यालय, कॉम्प्लेक्स एरिया गडचिरोली(महाराष्ट्र) 442605

✦ *संपर्क :-* 

१. अपर पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. समिर शेख (भा.पो.से.) - 9718193546 

२. पोउपनि अतूल  खंदारे, नागरी कृती शाखा, गडचिरोली - 9921688508

३. नियंत्रण कक्ष गडचिरोली -07132-223149

✦ *ई मेल आयडी -* civicactiongadchiroli@gmail.com

 

चला तर मग आदिवासी बांधवांना सढळ हाताने मदत करू व नक्षलवादाचा नायनाट करण्यास हातभार लावु.

Sharing

Visitor Counter