शेतकर्यांना दहा हजार कोटींचे पॅकेज जाहीर करताच राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी व महाविकास आघाडीच्या वतीने फटाके वाजवून आनंदोत्सव

शेतकर्यांना दहा हजार कोटींचे पॅकेज जाहीर करताच
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी व महाविकास आघाडीच्या वतीने फटाके वाजवून आनंदोत्सव
किल्ले धारूर /प्रतिनिधी
महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात झाला होता मागील दिवसांमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा मा खा शरदचंद्र पवार साहेब तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी शेतकऱ्याची पाहणी केली होती शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेला आहे त्याचे मोठे नुकसान झालेले पाहून शेतकऱ्याला आर्थिक मदत म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहा हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले यामुळे धारूर शहरांमध्ये राष्ट्रवादी व महाविकासआघाडी यांनी फटाके वाजवून या निर्णयाचे स्वागत केले यावेळी राष्ट्रवादीचे नेते मा माधव तात्या निर्मळ ,होरमाळे तात्या, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष नितीन शिनगारे काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष सिद्धेश्वर रंधवे परमेश्वर तिडके गणेश थोरात मायकरसय्यद रज्जाक शिवसेना चे अजित शिनगारे अमीर सय्यद शाहीद शेख आदि कार्यकर्ते उपस्थित होते








