बीडकरांनो उठा ,जागे व्हा,किती दिवस त्रास सहन करायचा?

Beed

बीडकरांनो उठा ,जागे व्हा,किती दिवस त्रास सहन करायचा?

 नागरिक, व्यापाऱ्यांना शिवसंग्रामकडून डफडे वाजवून आंदोलनाचे निमंत्रण  

जाणीवपूर्वक रखडवलेल्या रस्त्याचे काम तात्काळ सुरु करण्यासाठी हिरालाल चौकात शिवसंग्रामकडून आंदोलन - माजी नगरसेवक दत्ता गायकवाड 

बीड/प्रतिनिधी

 शहरातील रस्त्यांच्या कामांना बोगसगिरीचे नाव देऊन जाणीवपूर्वक थांबवले गेले आहे. हे सर्व हिस्स्यांसाठीची भांडणे बीडकरांच्या जीवावर उठत आहेत. शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष आ विनायक मेटे यांनी रस्त्याची कामे तात्काळ सुरु करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांच्यासमवेत बैठक घेतली होती. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी रस्त्यांची तात्काळ कामे सुरु करा, जे कुणी रस्त्याचे कामे अद्वैत त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हे नोंदवा, नगरसेवक कामे अडकत असतील तर डिसक्वालिफाय करा असे सक्त आदेश मुख्याधिकाऱ्यांना देऊनदेखील शहरातील कामे थांबलेलीच आहेत. आता बीडकरांनाच पुढाकार घ्यावा लागेल. बीडकरांनो उठा ... जागे व्हा .. किती दिवस त्रास सहन करायचा? असे म्हणायची आता वेळ आली आहे. म्हणून शिवसंग्राम उद्या सोमवार रोजी हिरालाल चौक येथे या या रस्त्याचे काम सुरु करावे यासाठी आंदोलन करणार असल्याचे पेठ बीड विभाग प्रमुख तथा माजी नगरसेवक दत्ता गायकवाड यांनी म्हंटले आहे. 
  हिरालाल चौक, पिंपरगव्हाण रोड, जालना रोड ते हनुमान मंदिराकडे जाणारा शाहूनगर मधील रस्ता, गजानन नगर(बार्शी नाका), स्वराज्यनगर, मोंढा रोड ते एमआयडीसी एरिया, कॅनॉल रोड या ठिकाणच्या अर्धवट रखडलेल्या रस्त्यांमुळे लोकांचे जगणे मुश्किल झालेले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊनही जर त्यांचे ऐकले जात नसले तर सर्वसामान्यांनी जायचे तरी कुणाकडे?अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणून सामान्य नागरिक व व्यापाऱ्यांना सोबत घेऊन सोमवारी आ विनायक मेटे यांच्या सूचनेनुसार तसेच जिल्हाध्यक्ष सुधीर काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाचे निमंत्रण डफडे वाजवून शहरातील व्यापारी व नागरिकांना देण्यात आले. यावेळी पेठ बीड विभाग प्रमुख दत्ता गायकवाड शहर उपाध्यक्ष,शेषराव तांबे, गणेश धोडरे, पेठ बीड अल्पसंख्यांक विभाग प्रमुख लालाभाई ,मुस्तफा, सामाजिक न्याय सरचिटणीस सुनील धायजे, बाळासाहेब हतागळे,सागर धनवे, शैलेश सुरवसे व इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Sharing

Visitor Counter