बीड शहरातील रखडलेली रस्त्याचे कामे पूर्ण करा,अन्यथा सोमवारपासुन अमरन उपोषण

Beed

बीड शहरातील रखडलेली रस्त्याचे कामे पूर्ण करा,अन्यथा सोमवारपासुन अमरन उपोषण 

बीड/प्रतिनिधी 

बीड शहरातील तसेच बीड भागात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक , हिरालाल चौक , महावीर चौक या भागातील रस्त्याचे काम जाणीवपुर्वक बंद पाडले गेले आहे . या रस्त्यांचे काम रखडल्यामुळे या भागातील नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे , त्यांना अक्षरशः घराच्या दाराबाहेर पाय टाकणे मुश्किल झाले आहे . दसरा असाच जात आहे , दिवाळी हि घाणीतच या लोकांनी काढायची का ? या जाणीवपुर्वक रखडवण्यात आलेल्या रस्त्यामुळे बीड जिल्हातील सर्वात जुनी हिरालाल चौक बाजारपेठ गेल्या ६ महिन्यांपासून बंद आहे . नागरिकांसह व्यापारी बांधवांना , शेतकऱ्यांना , लहानसहान व्यावसायिकांना उपासमारीची वेळ आली आहे . घाणी आणि दुर्गंधी मुळे अनेक आजार आजार होवुन लोकांना शारिरिक तसेच मानसिक त्रासाचा सामना करावा लागत आहे . प्रशासनाला वारंवार सांगुन देखील दखल घेतली जात नाही म्हणून सोमवार पासून उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदनद्वारे आशारा देण्यात आलं आहे.

Sharing

Visitor Counter