दोन समाजात त्रेढ निर्माण करणारे आक्षेपार्ह पोस्ट फेसबुक अकाऊंटवर

Georai

■ जिल्हाधिकार्यांच्या आदेशाला केराची टोपली
■ तिर्थपुरीच्या अप्पा उढाण विरूध्द शहागड पोलिस चौकीत गुन्हा दाखल

प्रतिनिधी /सय्यद इरफान 

शहागड : कोरोना विषाणूंच्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर सोशल मिडीयावरून व्हाॅट्अप, किंवा फेसबुक अकाऊंट वरून कुणीही दोन समाजात त्रेढ निर्माण करणारे आक्षेपार्ह संदेश टाकून विष पसरविण्याचे काम करू नये, असे जिल्हाधिकार्यांचे सक्तीचे आदेश आहे, तर पोलिस अधीक्षक एस चैतन्य यांनी यासंदर्भात यापूर्वी आवाहन केले आहे. तर चुकीची माहिती पसरविने, दोन समाजात त्रेढ निर्माण करणे, आक्षेपार्ह संदेश सोशल मिडीयावरून व्हाॅयरल करणार्यांना जेलची हवा खावी लागणार असल्याचे स्पष्ट म्हटले आहे. असे असतांना गोंदी (ता.अंबड) पोलिस ठाणे हद्दीतील तिर्थपुरी (ता.घनसावंगी) येथील अप्पा उढाण याने कोरोना विषाणूंच्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर एका विशिष्ट समाजाला टारगेट करत दोन समाजात त्रेढ निर्माण करणारे आक्षेपार्ह संदेश आपल्या फेसबुक अकाऊंटवरून पोस्ट केले. हि बाब शहागडच्या काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी ही बाब शहागड पोलिस चौकीचे उपनिरीक्षक हनुमंत वारे यांच्या निदर्शनास आणून देत, सामाजिक कार्यकर्ते आमेर गुलाब बागवान यांच्या फिर्यादीवरून जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उलंघन करत, दोन समाजात त्रेढ निर्माण करणारे आक्षेपार्ह संदेश फेसबुक अकाऊंटवर पोस्ट केल्या प्रकरणी तिर्थपुरीच्या अप्पा उढाण याच्याविरूध्द गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक हनुमंत वारे करत आहेत.

Sharing

Visitor Counter