पंकजाताई मुंडे यांच्या वरील दाखल केलेला गुन्हा मागे घ्यावा-आ. लक्ष्मण पवार

Beed

पंकजाताई मुंडे यांच्या वरील दाखल केलेला गुन्हा मागे घ्यावा-आ. लक्ष्मण पवार 

गेवराई भाजपाच्या वतिने तहसिलदाराकडे दिले निवेदन 

गेवराई/प्रतिनिधी 

प्रति वर्षा प्रमाणे याही वर्षी भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी भगवान भक्ती गडावर आँनलाईन दसरा मेळावा आयोजित केला होता पण त्या ठिकाणी गर्दी झाली होती पण यामध्ये पंकजाताईची  कसलिही चुक नसतांना फक्त राजकीय आकसापोटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे तो तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी आ. लक्ष्मण आण्णा पवार यांनी केली आहे 
 भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या दाखल झालेला गुन्हा मागे घेण्यात यावा अशी मागणी करत गेवराई भाजपाच्या वतिने आज दि. 27 रोजी तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी प्रकाश  सुरवसे, नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, याहिया खाँन, बंडू बारगजे, विनोद सौदरमल, मनोज हाजारे, संतोष सुतार, भाऊसाहेब मोटे, संदिप कु-हाडे,सजय आंधळे, आदि उपस्थित होते ना. तहसिलदार रामदासी यांच्या कडे दिले निवेदन

Sharing

Visitor Counter