पुजारी भगिनींना मारहाण प्रकरणात पोलिसांचा तपास संशयास्पद! तपास वरिष्ठ अधिकार्‍यांकडे द्या-शालिनी परदेशी

Beed

पुजारी भगिनींना मारहाण प्रकरणात पोलिसांचा तपास संशयास्पद !तपास वरिष्ठ अधिकार्‍यांकडे द्या-शालिनी परदेशी 

बीड/प्रतिनिधी 

बीड शरातील पुजारी भगिनींना झालेल्या अमानुष मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर निद्रिस्त पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या घटनेने शहर हादरले मात्र पोलिसांनी तातडीने तपास हाती घेतलेला नसून संशयास्पद वाटत आहे, त्यामुळे हा तपास वरिष्ठ अधिकार्‍यांकडे द्यावा अशी मागणी युवा पत्रकार संघाचे महिला जिल्हा अध्यक्षा शालिनी परदेशी यांनी अपर पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, मारहाण प्रकरणातील महिला आरोपीस काही  दिवसासाठी  जामीन मंजूर झाला. ही बाब अत्यंत धक्कादायक आहे. पोलिसांनी योग्य दिशेने तपास केला नाही. मुलींवर साळवे कुटुंबियांनी खुनी हल्ला केला. महिलांवर खाली पाडून मारहाण केलेली असताना विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला नाही. संबंधित तपास पोलिस अधिकारी पीडित महिलांना व्यवस्थित वागणूक देत नाहीत. यामुळे पोलिसावर आमचा संशय असून हा तपास वरिष्ठ महिला अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात यावा, अशी मागणी शालिनी परदेशी  यांनी केली यावेळी उपस्थित ललीता तांबारे,मनिषा स्वामी,सोनम आदींची उपस्थिती होती. 

Sharing

Visitor Counter