अवैद्य कॉम्प्लेक्स वर कारवाई कधी होणार?नगर परिषद वाल्यांची सांगळगाठ तर नाही ना? नागरीकांचे प्रश्न

अवैद्य कॉम्प्लेक्स वर कारवाई कधी होणार?नगर परिषद वाल्यांची सांगळगाठ तर नाही ना? नागरीकांचे प्रश्न
बीड/प्रतिनिधी
बीड शहरातील अवैधरित्या बांधकाम झालेल्या कॉम्प्लेक्स वर कारवाई कधी होणार? याकडे सर्व नागरिकांचे लक्ष वेधले आहे बीड शहरातील अनेक कॉम्प्लेक्सची पार्किंग गायब आहे अशा बीना पार्किंग वाल्या अवैधरित्या कॉम्प्लेक्सला बांधकामाची परवानगी दिली कोणी? परवानगी दिली नाही तर मग अश्या कॉम्प्लेक्स वर नगरपरिषद कारवाई कधी करणार? असे प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे.
बीड शहरातील जास्त वाहतुकीच्या व मार्केटच्या भागात अशा अवैधरित्या कॉम्प्लेक्स मुळे नागरिक रोडवरच वाहतूक पार्किंग करताना दिसतात यामुळे रोडवर मोठ्या प्रमाणामवर ट्रॅफिक होते व पाय चालणाऱ्या नागरिकांना या ट्रॅफिकचा व अडचणींचा सामना करावा लागत आहे .अशा अवैधरित्या कॉम्प्लेक्स बांधकामाला परवानगी दिल्ली कोणी? नगरपरिषद कारवाई का करत नाही? का यांच्याकडे नगर परिषद दुर्लक्ष करत आहे? असे वेगवेगळ्या प्रश्न चिन्ह नागरीकांना निर्माण झाले आहेत. वारंवार नगरपरिषदेच्या निदर्शनास आणून देखील पण याकडे नगर परिषद कसलीच कारवाई करताना दिसत नाही! यांच्यावर कधी कारवाई होईल? याकडे नागरिकांचे लक्ष वेधले आहे.








