युवा नेते डॉ योगेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त दारिद्रय रेषेखालील सुमारे 31 युवकांना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देणार

Beed

युवा नेते डॉ योगेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त दारिद्रय रेषेखालील सुमारे 31 युवकांना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देणार

नगरसेवक विकास जोगदंड यांचा अनोखा उपक्रम

बीड (प्रतिनिधी) 

31आक्टोंबर बीड जिल्ह्याच्या राजकीय पटलावर स्व काकु,माजी मंत्री लोकनेते जयदत्त क्षीरसागर, नगराध्यक्ष डॉ भारतभुषण क्षीरसागर यांनी केलेल्या भरीव  उल्लेखनीय कार्यामुळे अधोरेखित असे नाव कोरले गेले असुन त्यांच्याच पावलावर पाऊल टाकतं  युवकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी किंबहुना युवकांना आधार देणारं एकमेव युवा नेतृत्व डॉ योगेश क्षीरसागर असल्याने त्यांच्या रूपाने युवकांचा उद्धार करणारं युवा नेतृत्व लाभल्याची जाणीव तमाम युवकांच्या मनात असुन डॉ योगेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसा निमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवत दारिद्रय रेषेखालील सुमारे 31 गरजु सुशिक्षित बेरोजगार  युवकांना "मुख्यमंत्री रोजगार निर्मिती" योजने अंतर्गत उद्योग, व्यवसाय उभारण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देणार असुन या उपक्रमामुळे 31 नव उद्योजक निर्माण होणार असल्याने काही प्रमाणात का होईना बेकारीचा टक्का कमी होणार असल्याने सामाजिक उत्तरदायीत्व हेचं आपले परम कर्तव्य असुन युवकांना हातात हात देऊन बळ देण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे 
तेंव्हा आपला स्वतःचा व्यवसाय उभारण्याचं ध्येय असणाऱ्या होतकरू युवकांनी उद्या दिनांक 1 नोव्हेंबर 2020 पासुन ते 20 नोव्हेंबर पर्यंत मंगेश जोगदंड संपर्क क्रमांक 9970384358 या व्हॅट्सऍपवर नाव नोंदणी करावी असे आव्हान भिम स्वराज्य सेनेचे संस्थापक/अध्यक्ष तथा नगरसेवक विकास जोगदंड यांच्या सह अशोक कांबळे, मंगेश जोगदंड,सचिन जाधव,यांनी केले आहे

Sharing

Visitor Counter