ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी गुणवत्तेने आपल्या आई वडिलांचे नाव उज्वल करावे - प्रा ईश्वर मुंडे

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी गुणवत्तेने आपल्या आई वडिलांचे नाव उज्वल करावे - प्रा ईश्वर मुंडे
मंगेश साखरेचा भव्य सत्कार
किल्ले धारूर/प्रतिनिधी
धारूर तालुक्यातील चिंचपूर येथील चि मंगेश पांडूरंग साखरे याने नीट परीक्षेत ७२० पैकी ६६५ गुण मिळवून आपला वैद्यकीय प्रवेश निश्चित केला मंगेश साखरे हा ग्रामीण भागातील विद्यार्थी असून देखील त्याने यश मिळवले त्या बद्दल त्याचा धारुर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला
यावेळी राष्ट्रवदी काँग्रेस पार्टीच्या तालुका अध्यक्ष प्रा ईश्वर मुंडे म्हणाले ग्रामीण भागातील विद्यार्थीही हुशार असतात त्यांनी मिळालेला संधीचे सोने केले पाहिजे गुणवत्तेने आपल्या आई वडिलांचे नाव उज्वल केले पाहिजे गरीब होतकरू गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेहमीच उभी आहे असेही ते म्हणाले
सत्कार प्रसंगी युवक तालुका अध्यक्ष सटवा अंडील , सरपंच रतन शेंडगे ,ज्येष्ठ नेते कृष्णा साखरे, पांडुरंग साखरे इत्यादी उपस्थित होते








