धारुर घाटात ट्रकचा व टेम्पोचा अपघात

धारुर घाटात ट्रकचा व टेम्पोचा अपघात
किल्लेधारुर/प्रतिनिधि
धारुर घाटात दि.31/10/2020 मध्यरात्रि ट्रकचा व टेम्पोचा अपघात झाला.धारुर घाटाचा अरुंद रस्ता असल्यामुळे अपघाताची मालिका सुरू आहे. ट्रक कटड्यावर जाऊन लटकला तर टेम्पो डोंगराच्या दिशेने पलटी झाला.
या अपघातामध्ये टेम्पो चालक धम्मपाल बनसोडे हा किरकोळ जखमी झाला असुन या घटनास्थळी इरफान शैख या युवकाने गंभीर अवस्थेत असलेल्या वाहन चालकाला तात्काळ धारुर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले टेम्पो चालकाचा पुढील उपचार ग्रामीण रुग्णालयात सुरु आहे.
धारुर घाटाची रुंदी करनाची समस्या कधी सूटनार ? अपघाताची मालिका कधी थांबनार ? असा प्रश्न शहरवासीयांत व वाहन चालकांच्या मनात निर्माण होत आहे. राष्ट्रीय महामार्ग 548 (क) या धारुर घाट रस्त्याचे रुंदीकरण तात्काळ सुरु करावे अशी मागणी बीड जिल्हा विश्वमानव अधिकार परिषदेचे जिल्हा अध्यक्ष अतिक इस्माईल मोमीन यांनी या प्रसिद्धि पत्रकाद्वारे सार्वजनिक बांधकाम विभाकडे केली आहे.








