मौजे साळेगांव येथील खुनाचा गुन्हा अवघ्या सहा तासात उघडकीस

मौजे साळेगांव येथील खुनाचा गुन्हा अवघ्या सहा तासात
उघडकीस
बीड/प्रतिनिधी
दि.३० रोजी पोलीस स्टेशन , केज येथे गु.र.नं .453 / 2020 कलम 302 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल आहे . त्यामधील मयत महिला ही तिचे शेतात कापुस वेचीत असतांना तिला कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरुन जिवे मारुन खुन करुन तिचे प्रेत कापसाचे पिकात टाकून दिले होते . त्या संदर्भात वरिष्ठांनी गुन्हा उघड करण्यासाठी व आरोपी शोधकामी पो.नि.केज व पो.नि.स्था.गु.शा. यांना सुचना दिल्या . त्यावरुन पो.स्टे.चे व स्था.गु.शा.चे दोन पथके आरोपी शोधकामी रवाना केले होते . दोन्ही पथकांनी पो.स्टे.केज हद्यीत मौजे साळेगाव शिवारात घटनास्थळी जावून बारकाईने पाहाणी करुन आरोपीचा शोध घेत असतांना त्यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की , साळेगांव येथील पंकज भगवान जाधव व अजय उर्फ धनू दत्ता इंगळे यांनी तिचा खुन केला असावा अशी खात्रीशिर माहिती मिळाल्याने , स्था.गु.शा.चे पथकाने नमुद दोन्ही इसमांचा शोध घेवून साळेगांव ता.केज येथून ताब्यात घेवून त्यांना त्याचे नाव , पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव 1 ) पंकज भगवान जाधव वय 23 वर्षे 2 ) अजय उर्फ धनू दत्ता इंगळे वय 22 वर्षे दोन्ही रा.साळेगांव ता.केज असे सांगीतले . त्यानंतर गुप्त बातमीदाराकडून अधिक माहिती घेवून तसेच तांत्रीक मुद्याच्या आधारे त्या संदर्भाने अधिक व बारकाईने चौकशी केल्याने वरील नमुद दोन आरोपीतांनी मयत महिलेला कापूस वेचण्यासाठी शेतात बोलावले . आरोपींनी सदर महिलेचा गळा आवळून व कपाळावर दगडाने मारुन तिचा खुन केल्याची कबुली दिली व तपासात तसे निष्पन्न झाल्याने वरील दोन्ही आरोपींना पो.स्टे.केज येथे हजर केले आहे . गुन्हयाचा पुढील तपास पो.नि.श्री.त्रिभुवन , पो.स्टे.केज हे करीत आहेत . सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा , बीडचे पो.नि.श्री.भारत राऊत , पो.नि.श्री.त्रिभुवन पो.स्टे.केज , स्था.गु.शा.चे पोलीस अंमलदार बालाजी दराडे , हनुमान खेडकर , मनोज वाघ , प्रसाद कदम , राहूल शिंदे , चालक संजय जायभाय यांनी केलेली आहे .








