किल्ले धारूर ग्रामीण रुग्णालयाची १०८ रुग्ण सेवा वाहन शोभे साठीच-अतीक मोमीन

किल्ले धारूर ग्रामीण रुग्णालयाची १०८ रुग्ण सेवा वाहन शोभे साठीच-अतीक मोमीन
किल्ले धारूर/प्रतिनिधी
धारूर ग्रामीण रुग्णालयात अनेक वेळा १०८या वाहनाची सुविधा वेळेत मिळत नसल्याने अनेक रुग्णांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
दिनांक १९/१०/२०२०रोजी शहरातील एका महिलेला ९:५०वा.घेऊन गेले असता डॉ म्हणाले सदरील रुग्णाची तब्येत खूप खराब झाली आहे.आपण या रुग्णाला तात्काळ अंबेजोगाई येथील स्वाराती येथे उपचारासाठी घेऊन जा असं सांगण्यात आले व रुग्णाच्या नातेवाईकाला १०२-१०८येथे फोन करण्यासाठी सांगण्यात आले.त्यावेळी ग्रामीण रुग्णालय धारूर येथे १०८हे वाहन उपलब्ध होती.तरीही रुग्णाच्या नातेवाईकाला तीन ते चार तास वाहनाची वाट पाहावी लागली.तसेच काल दुपारी देखील ग्रामीण रुग्णालय धारूर येथे एका गरोदर महिलेला स्वराती येथे घेऊन जाण्यासाठी सांगण्यात आले.१०८ हे वाहन रुग्णालयात उभी असून देखील सदरील रुग्णाला आरदा,एक तास १०८या वाहनाची वाट पाहावी लागले.अशीच भूमिका जर धारूर ग्रामीण रुग्णालयातील उभी असलेले१०८ या वाहनाची राहिली तर रुग्णांना आपले जीव गमवावे लागेल हे शक्यता नाकारताच येणार नाही.म्हणून किल्ले धारूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीये अधीक्षकांनी याची दखल घ्यावी व रेफर रुग्णांची होणारी गैर सोय तात्काळ थांबवावी अशी मागणी या प्रसिद्धि पत्रकातून विश्व मानव अधिकार परिषदेचे जिल्हा प्रमुख अतीक इस्माईल मोमीन यांनी केली आहे.








