शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाच्या वतीने मराठवाडा पदवीधर मतदारसंघात उमेदवार उभे करण्याची तयारीत

शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाच्या वतीने मराठवाडा पदवीधर मतदारसंघात उमेदवार उभे करण्याची तयारीत
बीड/प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यातील, विद्यार्थी, शिक्षक, याचे प्रलंबित प्रश्न जलदगतीने सोडविण्यासाठी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ( ABUSS)च्या वतीने मराठवाडा पदवीधर मतदारसंघात स्वाताचे उमेदवार उभे करण्याची तयारीत आहे अशी माहिती महिला शाखा राज्य अध्यक्ष नाहीद खातून आणि बीड जिल्हा अध्यक्ष मास्टर सिद्दिक यांनी दिली. अखिल भारतीय उर्दु शिक्षक संघाचे वतीने राज्य अध्यक्ष महेबुब तांबोळी यांचे अध्यक्षतेखाली आँनलाईन
बैठकीत झालेल्या ठरावनुसार, मराठवाड्यातील शिक्षकांचे न्याय हक्कासाठी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाच्या वतीने स्वाताचे उमेदवार उभे करावे अशी मागणी करण्यात आली आहे. मराठवाडा समवेत विविध मतदारसंघात अखिल भारतीय उर्दु शिक्षक संघाचे उमेदवार उभे करण्याचे की, सेक्युलर उमेदवारांना पाठिंबा देण्याचं या बाबतीत अंतिम निर्णय अखिल भारतीय उर्दु शिक्षक संघाचे संस्थापक साजिद निसार अहमद, आणि महेबुब तांबोळी, घेणार आहे. अखिल भारतीय उर्दु शिक्षक संघाचे वतीने पाठिंबा देण्यात येणाऱ्या उमेदवारांना मोठी संख्येने मतदान करावे अशी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे वतीने या वेळी विनंती करण्यात आली आहे.








