एकदिवसाआड संचारबंदी शिथील जिल्हा अधिकारी राहुल रेखावर
Beed

बीड/प्रतिनिधी
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरुवातीला 21 दिवसाचा लाॅकडाऊन करण्यात आला होता, त्याची मुदत आज संपणार होती, परंतु वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, परत देशात तीन मे 2020 पर्यंत लॉक डाऊन कायम ठेवण्यात आला आहे, याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली आहे. याच अनुषंगाने जिल्ह्यात सुद्धा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी 30 एप्रिल 2020 पर्यंत लाॅकडाऊन कायम ठेवला असून पूर्वीप्रमाणेच एक दिवस आड अत्यावश्यक खरेदीसाठी सकाळी सात ते साडेनऊची वेळ देण्यात आली आहे.
यामध्ये ३० तारखेपर्यंत एकदिवसाआड सकाळी ७ ते ९:३० संचारबंदी शिथील. १५, १७, १९, २१, २३, २५, २७, २९ ला शिथीलता राहणार आहे. अत्यावश्यक वस्तींची खरेदी करता यावी, यासाठी जिल्हाधिकारी यांनी यादिवसी सवलत दिली आहे.








