गढीच्या सरपंच व ग्रामसेवकानी ४० लाखाचा भ्रष्टाचार करुन गावाची वाट लावली-ग्रामस्थ बसले उपोषणाला

Beed

गढीच्या सरपंच व ग्रामसेवकानी  ४० लाखाचा भ्रष्टाचार करुन गावाची वाट लावली-ग्रामस्थ बसले उपोषणाला 

 भ्रष्टाचार  करणार्या सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कार्यवाहीसाठी  ग्रामस्थ  गेवराई   पंचायतसमिती समोर उपोषण सुरु 

गेवराई/प्रतिनिधी 

  गेवराई तालुक्यातील गढी ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामसेवक यांनी तीन महिन्यापुर्वी कुठलेच काम न करता कागदोपञी दाखवत  ४० लाख रूपये उचले असुन ग्रापंचायत मुदत संपल्यावर  जुने रेकार्ड   नविन प्रशासकास  सरपंच व ग्रामसेवक यानी दिले नव्हते, यांची तक्रार औरगाबादं आयुक्त कार्यालय  येथे गावातील ग्रामस्थ मा गायकवाड अंकुश , घोगंडे विष्णुपंत , मंगेश काबंळे मुंढे रामदास, नाकाडे दिलीपराव ,ससाणे अमोल व ईतर नागरीकानी निवेदन दिले होते व चर्चा केली होती  त्यामुळे चौकशी समिती लावली परंतू या चौकशी समितीने ४ वेळेस गावात येऊन ग्रामपंचायतला पहिल्या चौकशीत रेकार्ड दिसले नाही सामान दिसले नाही .तरी पण चौकशी समिती अहवाल न देता उलट मागील ग्रामसेवक व सरपंच यांना सामान आणून टाकायला वेळ दिला त्यानीही आता १५ दिवसात काही सामान गावाच्या बाहेर तर काही रात्रीचे गावात आले तरी पण चौकशी समितीने डोळे झाकुन निसती बघायची भुमिका घेतली .गढी ग्रामपंचायतचे नविन  ग्रामसेवक व सरपंच प्रशासक  यांनी लेखी दिले कि आमच्या ताब्यात काहीच दिले नाही व ग्रामपंचायतला सुधा सामान नाही तरी पण चौकशी समितीने १ महीना झाले तरी काहीच कार्यवाही केलेली नाही.                     यामुळे गढी ग्रामस्थानी जो पर्यत  सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कार्यवाही होत नाही तोपर्यत पचायतं समिती समोर दिनांक ०४.११.२०२० रोजी पासून  मा गायकवाड अंकुश ,घोगंडे विष्णुपंत ,काबंळे मंगेश ,मुंढे रामदास ,नाकाडे दिलीप ससाणे अमोल उपोषणाला बसले असुन रितसर निवेदन  गटविकास अधिकारी ,मुख्यकार्यकारी अधिकारी बीड ,व पोलीस स्टेशनला दिले आहे   असुन खालील माहिती व मागण्या आहेत                                        पैसे कुणाच्या स्वक्षरीना  व कशा पद्धतीने उचलले याचा दस्तावेज देणे. पैसे उचलतानी इंजिनियर व बिडिओ याच्या खोटया सहया आहेत यामुळे त्याची चौकशी करणे , चौकशी समितीने खरे जे जे पाहीले तोच अहवाल सादर करणे, पैसे खर्च करताना कृती आराखडानुसार पैसे खर्च झाले नाहीत.                                    4 महीने झाले पैसे उचलून तरीही आज गावात सामान येत असतानी चौकशी समिती यानी काहीच अहवाल तयार का केला नाही.  गावाचा व आमचा विचार करून लवकर कार्यवाही व्हावी नसता आमरण उपोषण करणार आसल्याचे सांगितले त्या नुसार ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत

Sharing

Visitor Counter