घाटात पुन्हा अपघात,ट्राफीक जाममुळे नाकीनऊ

घाटात पुन्हा अपघात,ट्राफीक जाममुळे नाकीनऊ
किल्लेधारूर/प्रतिनिधी
येथील घाटात पुन्हा ऊसाचा ट्रक पलटी झाल्याची घटना घडली असून यामुळे तासनतास ट्राफीक जाम होत आहे. अरुंद घाट रस्त्यामुळे वाहनधारकांच्या नाकीनऊ येत असल्याचे दिसत आहे.
येथील ५४८ सी राष्ट्रीय मार्गावर असलेल्या अरुंद घाटात अपघात होण्याची शृंखला दिवंसेदिवस सुरुच आहे. रस्त्यावर सध्या मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असुन दररोज अपघात होत आहेत. रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न शासनाच्या दप्तर दिरंगाईत अडकला असुन वाहनचालकांना याचा फटका बसत आहे. दि.४ रोजी सकाळी घाटात ऊसाचा ट्रक पलटी झाला. यामुळे बराच वेळ वाहतुक ठप्प होती. याच रस्त्यावर दोन दिवसांपुर्वी सोनीमोहा फाट्याजवळ ट्रक्टर पलटी होवुन वाहतूक ठप्प पडली होती तर घाटात चार दिवसांपुर्वी ट्रक व टेम्पोची समोरासमोर धडक झाली होती. तात्काळ या उर्वरित रस्त्याचे रुंदीकरण होणे गरजेचे झाले आहे.








