कोरोना कोव्हिड -19 संसर्गजन्य आजाराचे पार्श्वभुमीवर बॅकांनी कर्ज वसुलीसाठी सक्त दिमनकारी उपायोजना,शारिरीक , मानसिक व आर्थिक पिळवणुक करू नये

Beed

कोरोना कोव्हिड -19  संसर्गजन्य आजाराचे पार्श्वभुमीवर बॅकांनी कर्ज वसुलीसाठी सक्त दिमनकारी उपायोजना,शारिरीक , मानसिक व आर्थिक पिळवणुक करू नये

बीड/प्रतिनिधी 

संपुर्ण भारत देशामध्ये , महाराष्ट्र राज्यामध्ये तसेच बीड जिल्हयामध्ये मार्च 2020 पासुन कोरोना ( कोव्हिड -19 ) आजाराचा प्रादुर्भाव झालेला आहे . त्यामुळे भारत सरकारने व महाराष्ट्र शासनाने दि .23 मार्च 2020 पासुन प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन लॉकडाऊन जाहिर केलेला आहे . सदरच्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये शेती व जोडधंदे , छोटे व मोठे उदयोगधंदे , व्यवसाय , दळणवळण व आर्थिक व्यवहार बंद होते . अदयापही बरेच व्यवसाय व उदयोगधंदे बंद अवस्थेत आहेत . ( कोव्हिड -19 ) प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे व्यवसायामध्ये व अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण झालेल्या मंदीमुळे तरुणांचे रोजगार गेले आहेत . तसेच व्यवसाय , उदयोगधंदे बंद असल्यामुळे छोटे उदयोजकही संकटात सापडले आहेत . शेतकरी वर्गही आर्थिक संकटात सापडलेला आहे . उपरोक्त सर्व परिस्थिती विचारात घेऊन भारत सरकार , रिझर्व बँक ऑफ इंडिया यांनी बॅकांना व वित्तीय संस्थांना या कालावधीतील कर्जदारांच्या कर्जावर व कर्ज वसुलीपासुन या लॉकडाऊन कालावधीसाठी हप्ते वसुलीपासुन सुट दिलेली होती . तसेच कर्ज वसुलीच्या हप्त्यांना स्थगीती देऊन सदर हप्त्यांचे अधिस्थगन केले आहे . बीड जिल्हयामध्ये लॉकडाऊनच्या कालावधीत अनेक छोटया - मोठया उदयोगधंदयावर मोठा परिणाम होऊन त्यांची आर्थिक स्थिती बिगडली असल्याने विविध बँका , सहकारी पतसंस्था , खाजगी बँका , फायनान्स कंपन्या इ.चे कर्जाचे हप्ते भरण्यासाठी सवलत मिळणेबाबत या कार्यालयास विविध निवेदन प्राप्त झालेले आहेत . भारत सरकारने व रिझर्व बँक ऑफ इंडियाने सक्तीची वसुली न करण्याबाबत परिपत्रक काढलेले आहे . करीता बीड जिल्हयातील राष्ट्रीय , वाणिज्य , सहकारी बँका व वित्तीय संस्था , खाजगी पंतसंस्था , फायनान्स कंपन्या यांना कोव्हिड -19 मुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत कर्जाच्या हप्त्यांचे वसुलीच्या अनुषंगाने रिझर्व बँक ऑफ इंडिया यांनी दिलेल्या मार्गदर्शक सुचनाचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत तसेच सक्त / दमनकारी उपाययोजना , शारिरीक , मानसिक व आर्थिक छळवणुक न करण्याबाबत याव्दारे निर्देश देण्यात येत आहेत .

Sharing

Visitor Counter