फळे व भाजीपाला विक्रीचे पास घेतांनी शेतकऱ्यांचे हाल

Beed

(बीड प्रसार न्युज)
 कृषी विभागात भाजीपाला व फळे विक्रीचे पास घेण्यासाठी कृषी कार्यालयात शेतकरी व किरकोळ व्यापाऱ्यांची मोठी  गर्दी झाली होती.काल पर्यंतचे अर्ज स्वीकारण्यात आले साधारणतः ७०० ते ७५० अर्ज स्वीकारून कृषी अधिकारी यांनी ३५० अर्ज वाटप देखील केले परंतु त्याठिकाणी लोकांची खूप मोठी गर्दी पहावयास मिळाली.

एकीकडे जिल्हा अधिकारी सांगत आहे की योग्य ते अंतर ठेवा,तोंडाला मास्क लावा परंतु या ठिकाणी  जिल्हा अधिकारी यांचे उल्लंघन करताना लोक  दिसत होते.

शेतकरी व व्यापार्यांनी नवीन पास-साठी अर्ज स्वीकार करण्यासाठी सांगीतले असता कृषी अधिकार्यांनी सांगितले 
जिल्हा  अधिकारी यांचे पुढील आदेश येईपर्यंत अर्ज स्वीकारता  येणार नाही.अशी माहिती सांगून शेतकरी व व्यापाऱ्यांना पोलीस बळाचा वापर करून कृषी कार्यालया परिसरातून बाहेर काढण्यात आले.

कृषी अधिकारी यांनी बीड प्रसारशी बोलताना सांगितले की नगर परिषद ने बीड शहरात ८४ प्रभाग बनविलेले आहेत व एका प्रभागात ४ ते ५ परवाने धारक व्यापार करतील असे सांगितले.

या ठीकाणी फक्त आणि फक्त शेतकर्यांचे हाल होताना  दिसत असुन या कडे प्रशासनाने देखील विचार केला पाहिजे व फेर विचार करून पुढिल आदेश जारी केले पाहिजे.

Sharing

Visitor Counter