स्वच्छ सुंदर गेवराई हीच आहे का? नगर परिषदेचा याकडे दुर्लक्ष का?-नविद मशायक
Beed

स्वच्छ सुंदर गेवराई हीच आहे का? नगर परिषदेचा याकडे दुर्लक्ष का?-नविद मशायक
बीड/प्रतिनिधी
गेवराई शहरातील वार्ड क्रा.४ मोमीन पुरा.खडक पुरा नाल्या बंद करून रोड वर दुर्गंधीयुक्त घाण पाणी येत असल्याने नागरीकांचे आरोग्य धोक्यात असल्याचे स्पष्ट चित्र दिसतमुळे स्वच्छ सुंदर गेवराई हीच आहे का?असे प्रश्न नागरीकात उपस्थित होत आहे.
रस्त्यावर तुंबलेल्या पाण्याकडे नगर परिषद दुर्लक्ष करीत आहे
सध्या दिवाळीच्या सणासाठी लोकांची खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ये जा असताना देखील अशा पाण्यातून लोकांना जाण्या येण्यासाठी खुप त्रास सहन करावं लागतो. अशी अवस्था असुन देखील पण स्थानिक नगर सेवकाला पण याचं काहीही एक पडलेला नाही.नगर परिषद ने तात्काळ साफ करावे अशी मागणी स्थानिक नागरीक करत आहेत.








