महिलेवर अॅसीड व पेट्रोल टाकुण जाळलेल्या आरोपीस देगलुर पोलीसांनी गेतलं ताब्यात घेतले

महिलेवर अॅसीड व पेट्रोल टाकुण जाळलेल्या आरोपीस देगलुर पोलीसांनी गेतलं ताब्यात घेतले
बीड/प्रतिनिधी
दिनांक 14/11/2020 रोजी पोलीस स्टेशन नेकनुर ता . जि . बीड हद्दीत मौजे येळंबघाट शिवारात ढाणे मंगल कार्यालया जवळील खदानिमध्ये एक 22 वर्षीय महिला अर्धवट जळालेल्या स्थितीत पडलेली आहे अशी माहिती पोलीस स्टेशन नेकनुर येथे मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक केंद्रे व सहकारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवुन पाहणी केली असता सदर ठिकाणी एक महिला अर्धवट जळालेल्या अवस्थेत मिळुन आली . पोलीस पथकाने नमुद महिलेस तात्काळ उपचार कामी सरकारी वाहनामध्ये टाकुण प्रथम सरकारी दवाखाना नेकनुर येथे आणले व प्रथमोपचार करुण पुढील उपचार कामी सरकारी दवाखाना बीड येथे शरिक केले . त्यानंतर सदर जखमी महिलेकडे विचारपुस केली असता नमुद महिलेने तिचे नाव सावित्रा दिगंबर अंकुलवार , वय 22 वर्षे , व्यवसाय घरकाम रा . शेळगांव ता . देगलुर जि . नांदेड असे असुन ती तिचे मर्जीने मागील दोन वर्षापासुन घरी कोणालाही काहिही न सांगता ती तिच्या गावातील अविनाश रामकिसन राजुरे , वय 25 वर्षे , रा . शेळगाव , ता . देगलुर , जि . नांदेड याच्यासोबत शिरुर जि . पुणे येथे राहत होती . दिनांक 13/11/2020 रोजी दुपारी 12.00 वा सुमारास सावित्रा हिचा प्रियकर अविनाश राजुरे हा तीला फिरण्यास जावु असे म्हणुन तिला सोबत घेवुन मोटार सायकलवर निघाले होते . त्यानंतर ते दोघे रात्री 09.00 वा सुमारास मांजरसुंबा ते केज जाणारे रोडवर येळंबघाट येथील ढाणे मंगल कार्यालया शेजारी असणाऱ्या खदानी जवळील शेतात झोपले होते . दिनांक 14/11/2020 रोजी पहाटे 03.00 वा सुमारास अविनाश राजुरे याने सावित्रा हिचा अचानक तिचा गळा दाबला व तोंडावर , छातीवर , हातावर पेट्रोल व अॅसीड टाकुण तिला पेटवुन दिले व तो सदर ठिकाणावरुन पळुन गेला अशी हकीगत सांगीतल्याने नमुद महिलेचा जबाब नोंद करुन पोलीस स्टेशन नेकनुर येथे गु.र.नं. 257/2020 , कलम 307 , 326 ( अ ) भादवी प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव हे करत आहेत . उपचारा दरम्यान नमुद महिलेचा दिनांक 14/11/2020 रोजी रात्री 10.55 वा मृत्यु झाला असुन नमुद गुन्ह्यामध्ये कलम 302 भादवी ची वाढ करण्यात आली आहे . नमुद गुन्ह्यामधील आरोपी अविनाश रामकिसन राजुरे , वय 25 वर्षे याचा शोध घेणे कामी दोन तपास पथके रवाना केले होते . पोलीस स्टेशन नेकनुर यांनी पोलीस स्टेशन देगलुर , जि . नांदेड यांच्याशी समन्वय साधला असता नमुद आरोपीस देगलुर पोलीसांनी देगलुर , जि . नांदेड येथुन ताब्यात घेतले आहे . नमुद आरोपीस नेकनुर पोलीस स्टेशनचे तपास पथक ताब्यात घेवुन पुढील कारवाई करत आहेत .








