नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपनी/ शेतकरी संघ/ शेतकरी बचत गट यांना शहरात पूर्णवेळ फळे व भाजीपाला फिरून विक्री करिता परवाना दिला जाणार.

Beed

 - तहसीलदार निलिमा थेऊरकर
    (बीड प्रसार न्युज )        
बीड जिल्ह्यात कलम 144 आदेश लागू करण्यात आलेला आहे. संचारबंदी अंतर्गत शिथील करण्यात आलेल्या कालावधीत जीवनावश्यक फळे व भाजीपाला यांचे खरेदी व विक्री करिता आष्टी शहरातील विविध ठिकाणी नगरपंचायत व कडा ग्रामपंचायत मार्फत ठिकाणे निश्चित करण्यात आलेली असून, सदर ठिकाणी भाजीपाला विक्री होत आहे. परंतु कोरोना रोगाचा संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक त्या प्रतिबंधक उपाय योजना करणे गरजेचे आहे. यामध्ये खरेदी किंवा विक्री करताना योग्य ते सामाजिक अंतर ठेवावे, एकच रांग करून उभे राहून भाजीपाला खरेदी करावा असे अपेक्षित आहे. परंतु संचारबंदी अंतर्गत शिथिल करण्यात आलेल्या कालावधीत जीवनावश्यक फळे व भाजीपाला यांची खरेदी व विक्री करिता नागरिकांची गर्दी होत असल्याचे आढळून येत आहे. 
               
त्याकरिता पुढील 3-4 दिवसात आष्टी शहरात व कडा ग्रामपंचायत क्षेत्रात शेतकरी ते ग्राहक थेट विक्री ची संकल्पना राबवत फळे व भाजीपाला यांचा सुरळीत पुरवठा होणे करिता शेतकरी उत्पादक कंपनी / शेतकरी संघ/  शेतकरी बचत गट यांना शहरात घरोघरी फिरून भाजीपाला व फळे विक्री करावयाची असल्यास त्यांनी कृषी विभागाकडे आपल्याकडील उपलब्ध फळे व भाजीपाला याची नोंदणी करावी. नोंदणी नुसार सदर गट यांना फळे व भाजीपाला विक्रीचा परवाना, वाहन परवाना तालुका स्तरावर दिला जाईल.  सदर शेतकरी गट/ शेतकरी उत्पादक कंपनी यांना दिलेल्या परवाना नुसार सकाळी 7:00  ते सायंकाळी 6:00  वाजेपर्यंत नेमून दिलेल्या ठिकाणी / विभागामध्ये फिरून भाजीपाला व फळांची विक्री करावी लागेल. यावेळी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील व सामाजिक अंतर राखून भाजीपाला विक्री केली जाईल याची जबाबदारी त्या गटाची राहील.  तसेच विक्री वेळी संबंधितास तोंडाला मास्क वापरणे, व हातात ग्लोज घालने व त्यांनी सॅनिटायझर चा वापर करणे बंधनकारक राहील.
            
याकरिता तालुकास्तरावर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करण्यात आलेली असून सदर समितीमार्फत शेतकरी उत्पादक कंपनी/ शेतकरी संघ/ शेतकरी बचत गट यांना परवाना देणे, फळे व भाजीपाला विक्रीचे ठिकाण निश्चित करून देणे तसेच दररोज संध्याकाळी विक्री करावयाची फळे व भाजीपाल्याचे दुसऱ्या दिवसासाठी जिन्नस वाजवी दर निश्चित करून देण्याची कारवाई करण्यात येईल. यामुळे शेतकऱ्यांना आपला भाजीपाला थेट ग्राहकांना विक्री करता येईल येईल व याचा लाभ सरळ शेतकऱ्यांना होईल तसेच यामुळे होणारी नागरिकांची गर्दी कमी होण्यास मदत होईल, नागरिकांची गैरसोय कमी होईल. 
              
फळे व भाजीपाला विक्री करताना तालुकास्तरीय समितीने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक दराने विक्री करता येणार नाही तसेच त्यांना रोजचा बाजार भाव दर्शविणारी फलक विक्री वाहनावर लावणे बंधनकारक राहणार आहे. असे आवाहन तालुका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

Sharing

Visitor Counter