रुपेश उगले च्या वैद्यकीय शिक्षणा च्या मदती करता धारूरची डाॕक्टर्स असोशियशन सरसावली

Beed

रुपेश उगले च्या  वैद्यकीय शिक्षणा च्या मदती करता धारूरची डाॕक्टर्स असोशियशन सरसावली

धारूर/प्रतिनिधी

धारूर येथील सर्व सामन्य कुंटूंबातील रुपेश दिनेश उगले यांचे वैद्यकीय शिक्षण सध्या सुरू आहे त्यांला महाविद्यालयाचे फिस भरण्या साठी आर्थीक मदतीची गरज होती धारूर शहरातील डाॕक्टर्स असोशीयशन ने पुढाकार घेऊन निधी जमा करून त्यांला मदत केली . शहरातून हि अनेक मदतीचे हात सरसावले त्यांचे शिक्षणा चा मार्ग यामुळे सुकर झाला.
धारूर शहरातील सर्वसामन्य कुंटूंबातील असणारे विद्यार्थी रुपेश दिनेश उगले  यांची वैद्यकीय शिक्षणा साठी जळगाव येथील डाॕ उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयस निवड झाली होती त्यांचे द्वितीय वर्षाचे वैद्यकीय शिक्षण सध्या सुरू आहे माञ आर्थीक अडचणी मुळे तो शैक्षणिक फिस भरू शकत नव्हता त्यामुळे त्यांचे पुढील वैद्यकीय शिक्षणास अडचन निर्माण होत होती. त्यांचे वैद्यकीय शिक्षणाची फिस भरण्यास आर्थीक मदतीची गरज होती व तसे अवाहण करण्यात आले शहरातील अनेक जन मदतीला सरसावले .तसेच शहरातील डाॕक्टर्स असोशीयशन च्या वतीने त्यांला 18500/- रुपये ची मदत करण्यात आली यावेळी नगराध्यक्ष डाॕ स्वरूपसिंह हजारी डाॕक्टर्स असोशीयशनचे अध्यक्ष 
डाॕ मयूर सांवत यांचे हस्ते रुपेश उगलेच्या आई वडीलाना हि मदत सपूर्त करण्यात आली यापुढे हि त्यांला सर्वोपरी मदत करण्याचे सांगण्यात आले यावेळी डाॕ डि एन मुंडे डाॕ बि आर सांळूके डाॕ राम शिनगारे   डाॕ सुंदर जायभाये डाॕ गोकूळ शिनगारे डाॕ भगवान तोंडे डाॕ मंञी आदी उपस्थीत होते

Sharing

Visitor Counter